[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
घरात कुठलीही समस्या नसल्याची माहिती
कबड्डी प्रशिक्षक विक्रांत उपाध्याय (२५ वर्षे) कानपूरच्या पंकी भागातील एफ-ब्लॉक गणेश शंकर विद्यार्थी नगरमध्ये राहत होता. तो अर्मापूरच्या मैदानावर मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण देत असे. त्याच्या घरी कोणतीही समस्या नव्हती आणि त्याचे कोचिंग देखील चांगले चालले होते, असं सांगितलं होतं.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबीयांची चौकशी केली
कुठलीच समस्या नसताना त्याने आत्महत्येसारखे भयंकर पाऊल का उचलले हे कुटुंबीयांनाही समजू शकलेले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुटुंबीयांची चौकशी केली. त्याच्या खोलीचीही झडती घेतली. मात्र, तेथून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
आत्महत्या करण्यापूर्वी रील बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं
मात्र, मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्याने ‘जीत की हवस नहीं किसी पे कोई बस नहीं क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो, मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरें…’ या गाण्यावर रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतरच त्याने रात्री आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांकडून तपास सुरु
याप्रकरणी एडीसीपी अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, पंकी येथे एका क्रीडापटूने आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. यासोबतच अद्यापपर्यंत कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
[ad_2]