सहकुटुंब हॉटेलमध्ये आले, जेवणाच्या टेबलवरच तरुणाने प्राण गमावले, अंगावर काटा आणणारा Video समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Madhya Pradesh Heart Attack Video: भारतात गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात तरुणांचा समावेशही अधिक आहे. वरातीतल नाचताना, खेळताना किंवा चालता-चालताही अनेक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती जेवण करत असताना अचानक खाली कोसळतो आणि जागीच प्राण सोडतो. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ खूपच हृदयद्रावक आहे. 

मध्य प्रदेशातील इंदौर येथील ही घटना आहे. एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. तिथे सर्व लोक जेवणाच्या टेबलवर बसलेले आहेत. जेवण येण्याची वाट पाहत आहे. मात्र, तितक्यात परिवारातील एका तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि तो टेबलवरच खाली कोसळला. कुटुंबातील लोक त्याला सांभाळण्यासाठी पुढे आले. पण काही कळायच्या आतच त्याचा जागीच मृत्यू झाला होता. 

हॉटेलमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा भयावह क्षण चित्रीत झाला आहे. या व्हिडिओत, तो व्यक्ती त्याच्या कुटुंबासह बसला होता. मात्र, अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि अचानक तो खुर्चीवरच खाली कोसळला, कुटुंबातील इतर लोकांनी त्याला सावरायचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी जागीच जीव सोडला होता. या घटनेने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. सहकुटुंब जेवायला आले असताना भलतंच अक्रित घडल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. 

दरम्यान, 14 डिसेंबर रोजी अभिनेता श्रेयस तळपदेलादेखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्याला लगेचच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. येत्या काही दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळणार आहे.  

Related posts