Bhandara Crime Suspicious Death Of Old Man Accused Of Murder Police Reached Graveyard Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भंडारा : जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परसोडी या गावात सूर्यकांत हटवार (70) या वृद्ध इसमाचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी मृत व्यक्तीचा सकाळी तातडीनं अंत्यसंस्कार केला. मात्र हा मृत्यू संशयास्पद असून या वृद्धाला जादूटोण्याच्या संशयावरून गावातील काही व्यक्तींनी मारहाण (Bhandara Crime) केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून भंडारा पोलिसांचं पथक तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या परासोडी गावातील स्मशानभूमीत पोहोचलं. मात्र तोपर्यंत मृतकावर अंत्यसंस्कार झालेलं होतं. गुप्त माहितीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी हे पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळ गाठत मृतकाची पत्नी, मुलगा यांना चौकशीसाठी घेऊन गेले. 

मृतकाच्या पत्नीनं पोलिसांना वृद्धाचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं सांगितलं आहे. तरीही पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दोन पथक नेमले आहेत. मृतकाची पत्नी आणि मुलाची साक्ष नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी एबीपी माझा शी बोलताना दिली.

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीने संपवले पतीचे आयुष्य

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पतीची गळा आवळून हत्या केली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं पतीचा मृतदेह जंगलातील नाल्यात फेकून दिला. ही खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडगी जंगलात उघडकीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, या प्रकरणात पतीपासून विभक्त राहणारी पत्नी आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची बाब समोर आली. या थरारक घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमसंबंधातून पतीची हत्या 

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांवरही गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आदेश राऊत (38) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रियकर विक्की करकाडे (38) आणि पत्नी ज्योती राऊत (35) असे या दोन आरोपीचे नाव आहे.

या घटनेतील मृतपती आदेश राऊत आपल्या पत्नीसह राहत होता. याच गावात प्रियकर विक्की करकाडे हा देखील राहत होता. मृत आदेश राऊत यांची पत्नी ज्योती राऊत आणि प्रियकर विक्की करकाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. कालांतराने ज्योती राऊत या आपल्या पतीपासून विभक्त राहून प्रियकर विक्की करकाडे सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याबाबत पतीला कुणकुण लागेल आणि आपल्या प्रेमसंबंध उघडकीस येईल ही भीती पत्नी आणि प्रियकरला होती.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts