Google Search History Solves Murder Mystery; गुगल सर्च हिस्ट्रीमुळे खून प्रकरणाचा उलगडा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

थिरुअनंतपुरम: संगीत शिक्षकानं केरळच्या पलक्कड जिल्ह्यात त्याच्या प्रेयसीची हत्या केली होती. हा हत्येचा छडा लावायला पोलिसांना दोन वर्षे लागली. संगीत शिक्षकानं २०२० मध्ये प्रेयसीला संपवलं. त्यावेळी संपूर्ण देशावर करोनाचं संकट होतं. त्यावेळी ३३ वर्षांच्या प्रशांत नंबियारनं त्याची प्रेयसी सुचित्रा पिल्लईची हत्या केली. सुचित्राला संपवून प्रशांतनं सारे पुरावे नष्ट केले. मात्र गुगल सर्च हिस्ट्रीनं या प्रकरणाचं गूढ उकललं.एका आध्यात्मिक गुरुनं आपल्या पत्नीचा खून कसा केला होता, अशी माहिती प्रशांतनं गुगलवर सुचित्राच्या हत्येपूर्वी शोधली. त्यानंतर त्यानं सुचित्राच्या हत्येची योजना आखली. त्याची योजना इतकी काटेकोर होती की पोलिसांना कित्येक महिने हत्येचं गूढ उकलता आलं नाही. प्रशांतनं गुगलच्या मदतीनं सुचित्राचा जीव घेतला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हत्येपूर्वी त्यानं काही रहस्यमय चित्रपट पाहिले. त्यांचं कथानक हत्या प्रकरणावर आधारित होतं.
साहेब, लगेच कब्रस्तानात जा! अज्ञाताकडून कॉलवर टिप, पोलिसांनी कबर खणली, बॉडी काढली अन् मग…
३३ वर्षांचा प्रशांत ४२ वर्षांच्या सुचित्राला आधी दिदी म्हणायचा. मार्च २०२० मध्ये त्यानं सुचित्राची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यानं गुगलवर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल सर्च केलं. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यानं काही चित्रपट पाहिले. प्रशांत सुचित्राची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते घराच्या मागे असलेल्या खड्ड्यात टाकले. या प्रकरणी कोल्लम न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गुगलच्या सर्च हिस्ट्रीनं प्रशांतचा गुन्हा उघडकीस आला.

नेमकं काय घडलं?
सुचित्राचा दोनदा घटस्फोट झाला होता. तर प्रशांत विवाहित होता. पेशानं ब्युटिशियन ट्रेनर असलेली सुचित्रा प्रशांतच्या पत्नीची लांबची नातेवाईक होती. २०१९ मध्ये प्रशांतला मुलगा झाला. त्याच्या बारशावेळी दोघे पहिल्यांदा भेटले. तिथून ओळख वाढत गेली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. सुचित्राला प्रशांतकडून मूल हवं होतं. मात्र याला प्रशांतचा विरोध होता. सुचित्रा आई झाल्यास दोघांचे अनैतिक संबंध जगापुढे येतील, अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्यानं सुचित्राला संपवायचं ठरवलं.
लेडी सिंघमचा संशयास्पद शेवट; कुटुंब, पोलीस प्रवासाविषयी अंधारात, एकट्या कुठे निघालेल्या?
कुटुंबियांना बाहेर पाठवलं अन् सुचित्राला संपवलं

मार्च २०२० मध्ये सुचित्रा आणि प्रशांतनं सोबत राहण्याची योजना आखली. त्यासाठी प्रशांतनं पत्नी आणि मुलाला कोल्लममधील घरी पाठवलं. या कालावधीतील व्हॉट्स ऍप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रशांतनं सुचित्राला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन घरी येण्यास सांगितलं होतं. आपण कोल्लमला ब्युटिशियन ट्रेनिंग अकादमीला जात असल्याचं सांगून सुचित्रा १७ मार्चला निघाली होती. क्लास घेण्यासाठी जात असल्याचं म्हणत तिनं घर सोडलं. त्यानंतर ती घरी परतली नाही.

[ad_2]

Related posts