Why US Investor Turned Down Seats On The Doomed Titanic Submersible; उद्योगपतीकडून सागर सफरीचा प्लान रद्द, जीव वाचला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वॉशिंग्टन: टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी टायटन पाणबुडीतून गेलेल्या पाच अब्जाधीशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओशनगेट कंपनीच्या टायटन पाणबुडीतून पाच जण १८ जूनला सफरीवर निघाले होते. ही सफर आठ तासांची होती. सफर सुरू झाल्यानंतर पावणे दोन तासांनी पाणबुडीशी असलेला संपर्क तुटला. या पाणबुडीत ओशनगेट कंपनीचे मालक स्टॉकटन रशदेखील होते.टायटन पाणबुडीतून प्रवास करणारे पाच अब्जाधीक्ष अभागी ठरले. मात्र लास वेगासमध्ये वास्तव्यास असलेले गुंतवणूकदार जय ब्लूम अपघातातून नशिबानं वाचले. स्टॉकटन रश यांनी वर्षभरापूर्वी जय ब्लूम आणि त्यांचा मुलगा सीन ब्लूम यांना टायटन पाणबुडीतून प्रवास करण्याबद्दल विचारणा केली होती. त्यासाठीची तिकिटं सवलतीच्या दरातही देऊ केली होती. खुद्द जय ब्लूम यांनी ही माहिती दिली आहे.
खूप घाबरलोय! पण…; समुद्राच्या पोटात शिरण्याआधी पाकिस्तानी अब्जाधीशाच्या लेकाचा लास्ट कॉल
तुम्ही एकदा समुद्रात उतरुन रोमांचक सफरीचा आनंद घ्यायला हवा. टायटॅनिकचे अवशेष पाहायला हवेत, अशा शब्दांत रश यांनी ब्लूम यांना सागरी सफरीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. ‘माझा मुलगा २० वर्षांचा आहे. लहानपणापासूनच त्यानं टायटॅनिकबद्दल बरंच वाचन केलंय. त्याला टायटॅनिकबद्दल बरीच उत्सुकता आहे. पण मी जेव्हा टायटन पाणबुडीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या मनातील चिंता वाढू लागली. त्यामुळे सागरी सफरीच्या काही क्षणांपूर्वी मी त्यांना नकार कळवला,’ असं ब्लूम यांनी सांगितलं.

ब्लूम पितापुत्रांनी टायटनमधून प्रवास करण्यासाठी नकार दिल्यानंतर पाणबुडीतील दोन आसनं पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान यांना देण्यात आली. पाणबुडीला झालेल्या अपघातात दाऊद पितापुत्रांचा शेवट झाला. ‘मी जेव्हा त्या पाकिस्तानी उद्योगपती आणि त्यांच्या १९ वर्षीय मुलाचे फोटो पाहिला, तेव्हा मनात विचार आला की त्यांच्या जागी माझा आणि माझ्या २० वर्षांच्या मुलाचा फोटो असता. पण देवाच्या कृपेनं आम्हा दोघांचा जीव वाचला,’ असं ब्लूम यांनी सांगितलं.
२ कोटी भरले, प्रचंड उत्कंठा; पण एकाएकी ट्रिप रद्द; उद्योगपती लकी ठरला, विचार अचानक का बदलला?
ब्लूम यांच्याकडे खासगी हेलिकॉप्टरचा परवाना आहे. मात्र पाणबुडीतून सफर करण्याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. पाणबुडीतील काही भागांबद्दल त्यांना अधिक चिंता होती. पाणबुडी नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरण्यात येणारं यंत्र एखाद्या व्हिडीओ गेम जॉयस्टिकसारखं होतं. आपत्कालीन परिस्थितीत आत बसलेले प्रवासी पाणबुडीला आतून उघडू शकत नाहीत, या बाबींमुळे ब्लूम चिंतेत होते.

[ad_2]

Related posts