[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पाणी पिण्यामध्ये ठेवा संतुलन
कधीही एका झटक्यात पाणी पिणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या शरीरातील पाण्याचे Intake एकदम वाढवले अथवा २ च्या ऐवजी ५-६ लीटर पाणी प्यायल्यात तर किडनीवर जास्त दबाव येईल आणि किडनीला हानी पोहचू शकते. तज्ज्ञांनुसार, पुरूषांना एका दिवसात ३-४ लीटर आणि महिलांना कमीत कमी २-३ लीटर पाण्याची गरज भासते. तुम्ही वर्कआऊट करत असाल तर अर्धा लीटर पाणी यात वाढवू शकता.
किती वेळापर्यंत पाणी प्यावे
जेव्हा लोकांना तहान लागते तेव्हा ग्लास उचलून अथवा सरळ बाटलीने एकदम पाणी पिण्यात येते. यासाठी ४-५ सेकंदाचा वेळ लागते. मात्र असे अजिबात करू नये. तुम्हाला नेहमी २-३ मिनिट्स घोट घोट घेत पाणी पिता यायला हवं आणि २ ते ५ सेकंद पाणी तोंडामध्ये फिरले पाहिजे. यामुळे तोंडातील लाळही पाण्यासह पोटात जाते आणि पाणी पचवण्यास शरीराला अधिक सोपे जाते.
(वाचा – पोटावरील चरबी सर्रकन जाळण्यासाठी उपयुक्त ठरतील ५ सुपरफूड्स, आहारात करा समाविष्ट)
वेळ पाहून पाणी प्या
पाणी पिण्याची वेळ आपल्याला नक्कीच ध्यानात ठेवायला हवी. बरेचदा आपण ऐकले आहे की, जेवणाच्या आधी १ तास आणि जेवणानंतर १ तास पाणी पिऊ नये. पण असं का? वास्तविक जेवण सुरू करण्यापूर्वी आपल्या पोटातील जठराग्नी सुरू होतो आणि पचनरस बनवतो आणि खाण्यापूर्वी अथवा नंतर पाणी प्यायल्यास, अग्नी शांत होतो आणि पचनरस पातळ होतो, ज्यामुळे खाणे पचत नाही आणि पोटात पडून खाणे सडते, ज्यामुळे गॅस, अपचन, ब्लोटिंग समस्या उद्भवतात.
(वाचा – प्रथिनांचा खजिना ठरतात कडधान्य आणि डाळी, ५ रेसिपी ज्या ठरतील आरोग्यासाठी लाभदायक)
कोणत्या तापमानातील पाणी प्यावे
उन्हाळ्यात लोक थंड पाणी पितात तर हिवाळ्यात गरम पाणी. पण जास्त गरम वा जास्त थंड पाणी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, उन्हाळ्यात माठातील पाणी आणि थंडीत कोमट पाणी प्यावे.
(वाचा – किचनमधील छोट्याशा काळ्या पदार्थाचे पाणी पिऊन नसांमधील चिकट घाण येईल बाहेर, Bad Cholesterol वरील रामबाण उपाय)
उभं राहून पाणी पिणे योग्य आहे का?
उभं राहून पाणी पिण्याने अनेक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात,ज्यामध्ये अपचन ही सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे. उभे राहून पाणी पिणे हे आपल्या अन्ननलिकेतून पोटापर्यंत पोहचते, ज्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. इतकंच नाही तर उभंं राहून पाणी प्यायल्याने शरीरातील फ्युईड लेव्हलही वाढते आणि यामुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हलही खराब होते आणि फुफ्फुस, हृद्याच्या प्रक्रियेवर ताण येतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा
[ad_2]