[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Monsoon : मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.
62 वर्षांनंतर मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून
तब्बल 62 वर्षांनंतर मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला आहे. यापूर्वी मान्सून मुंबई आणि दिल्लीत 21 जून 1961 रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आज मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची संभाव्य तारीख 11 जून तर दिल्लीत दाखल होण्याची संभाव्य तारीख 27 जून आहे.
14 दिवस मान्सून उशीरानं मुंबईत दाखल
परवापासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळं हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा कधी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज हवामान विभागानं मुंबईसह दिल्लीत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, यावर्षी तब्बल 14 दिवस उशीरानं मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं आहे. दरम्यान, पावसाला सुरुवात झाल्यामुळं मुंबईकरांनी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मुंबईत पावसाचा जोर वाढला
मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. असा जोरदार पाऊस सुरु राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरुन जाणार आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. मागील अर्धा पसापासून मुंबई उपनगरातील दहिसर भागात सुरू झालेल्या पावसामुळे दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळील सुहासिनी पावसकर सबवे परिसरात कमरे इतके पाणी साचले आहे यामुळे या भागातून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता.
उत्तर भारतातही पावसाला सुरुवात
सध्या दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच मुंबईतही चांगला पाऊस पडत आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली होती. मात्र, काही वेळापूर्वीच मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरवर्षी परिस्थिती मान्सून लवकर दाखल होतो. यावेळी मात्र, मान्सून दाखल होण्यास वेळ लागला आहे. यंदा मान्सूनवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम झाला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सूनसाठी सध्या वातावरण अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Weather Update : उत्तर भारतात पावसाची जोरदार हजेरी, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; वाचा हवामान विभागाचा अंदाज
[ad_2]