PM Narendra Modi Meeting With The Grand Mufti Of Egypt Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Egypt Visit : अमेरिकेचा (America) दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कालपासून इजिप्तमध्ये (Egypt) आहेत. इजिप्तमध्ये त्यांनी ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल करिम अल्लाम यांची भेट घेतली. आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा केली. शिवाय भारत आणि इजिप्तमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या. 

दरम्यान, आज पंतप्रधान मोदी कैरोमधील हकीम मशिदीत जाणार आहेत. त्यानंतर हेलियोपोलिस कब्रस्तानानाला भेट देतील. पहिल्या जागतिक युद्धात 4 हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यांचं इथं स्मारक आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींनी खास आयोजित केलेल्या मेजवानीत मोदी सहभागी होतील. दरम्यान, याच दौऱ्यात मोदींनी बोहरी समाजाशीही संवाद साधला.

इजिप्तच्या मंत्रिमंडळातील भारताच्या युनिटसोबत पंतप्रधान मोदींची बैठक

परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, कैरोमधील (Cairo) पहिल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली यांच्या नेतृत्वाखालील इजिप्शियन मंत्रिमंडळात स्थापन केलेल्या भारताच्या नव्या युनिटची बैठक घेतली. या बैठकीत सात कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इजिप्तमध्ये मोदींचं उत्साहात स्वागत 

इजिप्तमध्ये दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इजिप्तमधील स्वागताचे फोटो ट्वीट केले आहेत.  पंतप्रधानांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘मला विश्वास आहे की या दौऱ्यामध्ये भाजप आणि इजिप्तचे संबंध आणखी घट्ट होतील. मी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल-सिसी यांच्यासोबत अनेक मुद्द्यावर चर्चा देखील करणार आहे. तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होणार आहे.’ 

कसा असेल पंतप्रधान मोदींचा इजिप्त दौरा? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला इजिप्तचा दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रसिद्ध असलेली पुरातन अल हाकिम मशिदीत सुद्धा जातील. शनिवारी (24 जून) रात्री 9 वाजता मोदींनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर रात्री 10.10 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी इजितप्तच्या ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल करिम अल्लाम यांच्यासोबत देखील चर्चा केली. त्यानंतर रात्री 11 नंतर ते इजिप्तच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी इजिप्तचे राष्ट्रपती  अब्देल फताह एल-सिसी  यांची भेट घेणार आहेत. तर गेल्या 26 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा इजिप्तमधील राजकीय दौरा आहे.  काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये झालेल्या जी -20 च्या बैठकीत पाकिस्तान, चीन, तुर्की, सौदी अरेबिया या देशांसह इजिप्तनं देखील या बैठकीत सहभाग घेतला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PM Modi Egypt Visit : पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर, पंतप्रधान मुस्तफा मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर, गार्ड ऑफ ऑनर देऊन केले स्वागत

[ad_2]

Related posts