Acharya Pramod Krishnam Criticism On Prime Minister Narendra Modi Visit To Al Hakeem Masjid Egypt Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Visit to Al Hakim Mosque:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अल हकीम (Al Hakim Mosque) या मशिदीला दिलेल्या भेटीवरुन विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. शनिवारी (24 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्तमध्ये (egypt) पोहचले होते. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (25 जून) रोजी इजिप्तच्या अल हकीम या मशिदीला भेट देखील दिली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. 

काँग्रेसचे नेता आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांच्या मशिदीच्या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “थोड़ा” सा भरम…….ऐ जाने वफ़ा ये ज़ुल्म ना कर.” आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपचे खासदार संजय सिंह यांच्या ट्वीटला शेअर करत ट्वीट केले आहे. सध्या त्यांच्या या ट्वीटची माध्यमांमध्ये बरीच चर्चा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आपचे खासदार संजय सिंह यांचे ट्वीट

आपचे खासदार संजय सिंह यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यावर ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की,  ‘ग़ैरों पे करम अपनों पे सितम, ऐ जान-ए-वफ़ा ये ज़ुल्म न कर.’  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 शतकातील ऐतिहासिक अशा अल हाकिम या मशिदीला भेट दिली होती. या मशिदीचा जिर्णोद्धार करण्यासाठी भारतातील दाऊद बोहरा या मुस्लिम समाजाने मदत देखील केली होती. ही मशीद इसवी सन 1012 मध्ये उभारण्यात आली होती. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी या मशिदीच्या द्वारांवर करण्यात आलेल्या नक्षीकामाचे देखील कौतुक केलं. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत अल हकीम या मशिदीला भेट दिल्याची माहिती दिली होती. त्यांनी त्यांच्या ट्विटचा मजकूर हा उर्दू भाषेमध्ये लिहिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, ‘इजिप्तच्या अल हकीम या मशिदीला भेट दिल्याने सन्मानित झाल्यासारखं वाटलं. ही मशिद इजिप्तच्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीची ही एक मोठी साक्ष आहे.’  या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहरा समाजाच्या नेत्यांची देखील भेट घेतली. अल हकीम मशीद ही कैरोमधील चौथी सर्वात जुनी मशीद आहे.  ही मशीद  13,560 घन चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

PM Modi Award List: पंतप्रधान मोदींचा इजिप्तच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान; गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदी एकूण 13 सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित



[ad_2]

Related posts