On This Day In History June 27 Din Vishesh Today History

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

On this day in history june 27 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 27 जून रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. मराठा सैन्याचे सरसेनापती धनाजी जाधव यांचं निधन झाले होते. तर भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आरडी बर्मन यांचा जन्म झाला होता. मुंबईमध्ये इमारत कोसळल्यामुळे 19 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

सरसेनापती धनाजी जाधव यांचं निधन – 

सरसेनापती धनाजी जाधव यांचा मृत्यू 27 जून 1708 रोजी झाला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती.  गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग हात. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून संताजी आणि धनाजी यांनी वाचवले होते. धनाजी हे कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असताना पेठवडगांव येथे मरण पावले. त्यांना कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हा वाहूं लागल्यामुळे तो बरेच दिवसपर्यंत आजारी होते. त्यांची समाधी पेठवडगाव येथे आहे. 

आर.डी बर्मन यांची जयंती –

भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणजे आर.डी बर्मन (R D Burman). मनोरंजनसृष्टीत आर.डी बर्मन ‘पंचमदा’ या नावाने लोकप्रिय आहेत. 27 जून 1939 रोजी त्यांचा जन्म झाला तर 4 जानेवारी 1994 रोजी त्यांचे निधन झाले. आर. डी. बर्मन यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये ‘सर जो तेरा चक्रे’ (Sar Jo Tera Chakraye), ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ (Mere Sapnon Ki Rani), ‘कोरा कागज था ये मन मेरा’ अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे. आर. डी. बर्मन यांनी ‘भूत बंगला’ आणि ‘प्यार का मौसम’ या सिनेमात अभिनयदेखील केला आहे. त्यांनी संगीतविश्वाला नवीन परिभाषा दिली आहे. त्यांच्या गाण्यांची रसिक प्रेक्षकांना चांगलीच जाण आहे. 

सुनंदा पुष्कर यांची जंयती –

सुनंदा पुष्कर यांचा जन्म 27 जून 1962 साली झाला होता. त्या काश्मीरमधील सोपोरमध्ये राहणाऱ्या होत्या. त्यांचे वडील पी. एन. दास भारतीय लष्करात वरिष्ठ अधिकारी होते. सुनंदा पुष्कर या शशी थरुर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीमधील पंचतारांकित हॉटेल लीला पॅलेसमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. संशयास्पद परिस्थितीत झालेल्या या मृत्यूनं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाच्या तपासणीसाठी एसआयटीही नियुक्त करण्यात आली होती. शशी थरुर यांच्यावर आरोप झाले होते.

हेलेन केलर यांचा जन्म 

समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म आजच्याच दिवशी 27 जून 1880 मध्ये झाला होता. अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांचं निधन 1 जून 1968 रोजी झालं होतं. 

इमारत कोसळल्यामुळे 19 जणांचा मृत्यू – 

गेल्यावर्षी (2022) आजच्याच दिवशी मुसळधार पावसामुळे मुंबईतील 19 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला होता. एनडीआरएफ आणि अग्निशामन दलाने शर्तीचे प्रयत्न करत अनेकांचे जीव वाचवले होते. यंदाही मुंबईत इमारत कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत.

मंकीपॉक्समुळे पहिल्या रुग्णाचे निधन – 

मंकीपॉक्स या रोगामुळे पहिले निधन झाल्याची जागतिक आरोग्य संघटनेनी घोषित केले होते. कोरोना महामारीतून सावरल्यानंतर मंकीपॉक्स या आजाराने थैमान घातले होते.  ब्रिटनसह युरोपीय देशासह अमेरिका आणि भारतामध्येही मंकीपॉक्सने थैमान घातले होते. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास मंकीपॉक्स या रोगाचा वेगाने प्रसार होतो. हा विषाणूचा त्वचा, श्वसनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो. 

गॅस गळतीमुळे आंध्रात 14 जणांचे निधन – 

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पाइपलाइनचा स्फोट  झाल्यामुळे 2014 मध्ये आजच्याच दिवशी मोठी दुर्घटना घडली होती.  आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या स्फोटात 14 जणांचं निधन झालं होतं. 

आजचा दिवस जागतिक औद्योगिक कामगार दिवस (Industrial Workers Of The World Day) म्हणून साजरा करण्यात येतो. 

1954 :  पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

1954 मध्ये आजच्याच दिवशी अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्को, रशिया येथे सुरू झाले. अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिल्या 5000 किलोवॅट क्षमता असणाऱ्या विद्युतकेंद्राची स्थापना रशियाची राजधानी मॉस्को जवळील ओबनिन्स्क येथे करण्यात आली होती.

धावपटू पी. टी. उषा यांचा जन्मदिन.

27 जून 1964 रोजी धावपटू पी. टी. उषा यांचा जन्म केरळमधील कुट्टाली, कोझिकोड येथे झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्कापरंबिल उषा असे आहे.
1979 पासून त्या भारतीय ऍथलेटिक्सशी संबंधित आहेत. त्यांना अने,कदा “भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी” म्हटले जाते. त्या सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत.

1941 – रोमानियन अधिकार्‍यांनी तब्बल 13 हजार 266 जणांची हत्या केली होती. ही इतिहासातील सर्वात हिंसक घटना म्हणून ओळखली जाते. 

1838 : बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. 

1964 : साली दिल्ली येथील तीन मूर्तिच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

2008 : साली मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

2015 : साली संयुक्त राष्ट्र संघाने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात विशेष स्थान असणार्‍या सत्यजित रे यांचे चित्र प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

1839 : साली भारतीय इतिहासाच्या कालखंडातील प्रसिद्ध शिख साम्राज्याचे संस्थापक शिख धर्मीय महाराजा रणजीत सिंह यांचे निधन.

 

[ad_2]

Related posts