नात्यातील विवाहामुळे ‘थॅलेसेमिया’ आजाराला मिळतेय निमंत्रण..

पिंपरी ((प्रगत भारत न्युज) :- नात्यातील विवाहामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणाऱ्या थॅलेसेमिया या आजाराला निमंत्रण मिळते. तसेच गतिमंद, मतिमंदतेचा धोका वाढत आहे. व्यंग व विविध आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.थॅलेसेमिया हा हिमोग्लोबिनची कमतरता, आनुवंशिकता व रक्तात आढळणारे दोष यामुळे होतो. एकाच नात्यातील किंवा एकाच कुळातील व्यक्तीचे लग्न झाल्यास हा आजार होतो. पूर्वी एक नाड आली की लग्न करू नये, असा सल्ला ज्येष्ठ मंडळी देत असत. अपत्याच्या जन्मावेळी गुंतागुंत होऊन हा आजार होतो. नात्यामध्ये लग्न न केलेले चांगले.

थॅलेसेमियाची लक्षणे व उपचार…

थॅलेसेमिया आजाराची लक्षणे अगदी सामान्य आहेत. सतत अशक्तपणा जाणवणे, थकल्यासारखे वाटणे, ओटीपोटात सूज येणे, गडद लघवीला होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, त्याचबरोबर नखे, डोळे आणि जीभ फिकट होणे, मुलांची वाढ मंदावणे ही या आजाराशी संबंधित काही लक्षणे आहेत. थॅलेसेमियावर बोन मॅरो ट्रान्स्प्लांट हा एकमेव उपचार आहे.

थॅलेसेमिया बाधितांमध्ये लाल रक्ताच्या पेशी घटतात. थॅलेसेमिया बाधित असणाऱ्या मुलाच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी वेगाने कमी होत जातात आणि नवीन पेशींची निर्मिती- देखील होत नाही. या मुलांच्या शरीरात नेहमी रक्ताची कमतरता निर्माण होत असते. सर्वसामान्य शरीरामध्ये १२५ दिवसांपर्यंत आरबीसी (रक्तातील लाल पेशी) जिवंत राहतात. मात्र, थॅलेसेमिया या आजारपणात आरबीसी फक्त १० ते २५ दिवसांपर्यंत शरीरामध्ये टिकत असल्याने अशा रुग्णांना २० ते २५ दिवसां- नंतर रक्त चढवावे लागते. केवळ २० ते ३० टक्के रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून एचएलए आयडेंटिकल डोनर मिळू शकतो. ७० टक्के रुग्णांमध्ये रक्त गटाच्या अभावी उपचार होऊ शकत नाही. अशावेळी त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते.

Related posts