[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Crime News : प्रेमसंबंधास नकार दिल्याने प्रियकराने गुन्हा करण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. मात्र विवाहित तरुणीने प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण करुन त्याला गुजरातमधील वापी येथे नेण्यात आले होते. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापी येथे जाऊन तरुणाची सुटका केली.
गुजरातमधील वापी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या तरुणाचे एका 28 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. ही विवाहिता वापीमध्येच राहते. मात्र तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह करण्याचं ठरवल्याने तो पुण्यात परत आला होता. तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या विवाहित तरुणीने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचून थेट वापीला अपहरण करुन नेऊन डांबून ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती.
Pune Crime News: अपहरणाची दिली सुपारी…
आरोपी तरुणीने प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी दोघांना सुपारी दिली होती. या प्रकरणी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय 21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय 26, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
Pune Crime News : CCTV फुटेज समोर
तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे एनडीए रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात दिसून आलं होतं. पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी वापी येथे एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली.
Pune Crime News : घटनेमुळे पोलीसही चक्रावले…
या घटनेमुळे सध्या सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एरवी घडलेल्या घटनांमध्ये प्रियकराने प्रेयसीचा काटा काढलेला आपण पाहिला आहे. मात्र या प्रकरणात काहीसं उलट घडल्याने तपासादरम्यान पोलीसही चक्रावले होते. शिवाय आपल्याच प्रियकराच्या अपहरणासाठी सुपारी दिल्याचं पाहून पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं.
Pune Crime News : पोलिसांसमोर मोठं आव्हान…
पुण्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे आणि पोलिसांना चक्रावणारे गुन्हे समोर येत आहेत. त्यातच पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात काही टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे आता शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या सगळ्या टोळ्या रोखणं आणि बाकी सगळ्या गुन्हेगारांना गजाआड करणं, हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
हेही वाचा –
Darshana Pawar: दर्शनाच्या हत्येचा प्लॅन तयार होता; हत्या करण्यासाठी राहुल हांडोरेने सोमवारच का निवडला? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
[ad_2]