West Bengal CM Mamata Banerjee Helicopter Makes Emergency Landing At Sevoke Air Base Near Siliguri

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांची जलपायगुडीतील क्रांती इथ जाहीर सभा झाली होती. त्यानंतर बागडोगरा इथं जात असताना खराब हवामानामुळं  सलुगारा येथील आर्मी एअरबेसवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान, ममता बॅनर्जी या सुरक्षित असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते राजीव बॅनर्जी यांनी दिली. 

हेलिकॉप्टरला बैकुंठापूरच्या जंगल परिसारात जोरादर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु होता. या वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना हेलिकॉप्टरला करावा लागला. यामुळं ममता बॅनर्जी यांच्या कमरेला आणि पायाला दुखापतही झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. खूप मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं पायलटने आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 

 

पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस 

सध्या देशातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं हवामानातील दृष्यता कमी झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करुन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नौऋत्य मान्सून हा देशातील बहुंताश राज्यात सक्रिय झाला आहे. तसेच काही राज्यात मान्सूनने वेग पकडला आहे. त्यामुळं सध्या देशातील काही राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम बंगालसह, सिक्कीम, ओडिशा, हरियाणा चंदीगढ या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अनेक राज्यात खबार हवामानामुळं हवाई उड्डाण आणि वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. 



[ad_2]

Related posts