Chandrashekhar Azad First Reaction After Firing At Deoband In Saharanpur Uttar Pradesh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrashekhar Azad Attack:  उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण (Chandrashekhar Azad) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्राणघातक हल्ल्यानंतर आता चंद्रशेखर आझाद रावण यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर हे सहारनपूरच्या दिशेने गेले असल्याची माहिती रावण यांनी दिली. 

काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली असल्याची माहिती आहे. कारचे काचाही फुटल्या आहेत. गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एसएसपी डॉ. विपिन टाडा सहारनपूर यांनी पोलीस महासंचालक विजय कुमार यांना फोनवरून घटनेची संपूर्ण माहिती दिली. 

चंद्रशेखर आझाद यांनी काय म्हटले? 

चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले की, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण  होती. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्या सोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यु-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो. आमच्यासोबत असणाऱ्या एका डॉक्टर सहकाऱ्याला देखील गोळी लागली असावी, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. 

कोण आहे चंद्रशेखर रावण? ( Who is Chandrashekhar Azad)

चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे वकील, सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. 2015 मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ ही संघटना स्थापन केली.  ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे. 

अनुसूचित जातींवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध चंद्रशेखर आणि  भीम आर्मी संघटना काम करते. चंद्रशेखर हे  आंबेडकरवादी विचारसरणी मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना निःशुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली. 5 मे 2017 रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोपावरून 2017 च्या जूनमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि 2018 च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

[ad_2]

Related posts