Rahul Gandhi Visit To Mechanic Workshop Photos Working In Garage Viral In Karolbagh Delhi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अनेकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. कधी ते विद्यार्थ्यांना भेटतात तर कधी बाजारात दिसतात. आता  राहुल गांधींनी मंगळवारी दिल्लीतील करोलबाग येथील मोटरसायकल मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट दिली.  यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला. मेकॅनिक्सच्या  समस्या जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी भेट घेतल्याचे काँग्रेसने (Congress) म्हटले आहे.

गांधी घराण्याचे युवराज राहुल गांधी हे नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत येतात. ज्या राहुल गांधींना एकेकाळी पप्पू म्हणून हिणवलं गेलं होतं. त्याच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हजारोंचा समुदाय त्यांच्या सोबत दिसला. संसदेत त्यांनी कधी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले तर कधी थेट मोदींनाच जादू की झप्पी दिली. जस जशी राहुल गांधीची पदयात्रा पुढे सरकत गेली तस तसे ते सर्वसामान्यांच्या अधिक जवळ येत राहीले.. त्यांची पदयात्रा संपून काही महिने उलटले.. पण सॉफ्ट मनाचा हा नेता तसाच राहिला.

भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधींचा अनोखा अंदाज

कधी टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेणारे तर कधी मशरुम बिर्याणीचा स्वाद चाखणारे कधी लहानग्यांच्या पंगतीला जेवायला बसणारे तर कधी कॉलेजच्या कट्ट्यावर रमणारे कारचं स्टेअरिंग सोडूनकधी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हाती घेणारे तर कधी ट्रक ड्रायव्हर सोबत गप्पांमध्ये रंगणारे हा पॅटर्न राहुल गांधींचा आहे. भारत जोडो यात्रेपासून हा अंदाज जास्त पहायला मिळतोय. 

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

राहुल गांधींनी मंगळवारी दिल्लीतील करोलबाग येथील मोटरसायकल मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला आणि मेकॅनिकचं कामही शिकले. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  भारत जोडोतून राहुल गांधींनी संवाद साधला संपर्क वाढवला. आपल्या याच प्रेमाच्या दुकानातून त्यांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरु केलीये असंच म्हणावं लागेल..

संसदेत देखील त्यांचा हा अंदाज दिसला होता. जेव्हा एका भाषणादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली होती, याची चर्चा झाली. मात्र, फायदा नाही कारण, त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांना आणि त्यांच्या पक्षाला म्हणावं तसं यश आलं नाही. गेल्या वर्षी याच राहुल गांधींनी सर्वसामान्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेत भारत जोडो यात्रा सुरु केली. त्यात त्यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर..असा साडे तीन हजार किलोमीटरची पदयात्रा केली.त्यात प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्यांशी संवाद साधला. भारत जोडो  यात्रा संपली. मात्र राहुल गांधींचा अंदाज कायम राहिला.

हे ही वाचा :

Rahul Gandhi In Karnataka : फूड डिलिव्हरी पार्टनर्ससह नाश्ता, बाईक राईड; कर्नाटकात राहुल गांधींचा कामगारांसोबत संवाद

 

[ad_2]

Related posts