
पिंपरी (प्रगत भारत न्युज) :- महापालिकेकडून घनकचरा कर आकारणी सुरू केली आहे. याच्या निषेधार्थ आकुर्डी व्यापारी संघटना आणि आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने कर पावत्यांची होळी करण्यात आली. आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे, मनसे नेते के. के. कांबळे, ज्ञानेश्वर ननावरे, नारायण गोसावी, मधुकर देसले, चंद्रकांत इंगळे, वसंत सोनार, आत्माराम काळभोर, अतुल शितोळे, शिवाजी मिसाळ, विद्या मिसाळ, सारिका कोरटकर, सृष्टी कुऱ्हाडे आणि आकुर्डी मधील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला. घनकचरा कर आकारणी लवकरात लवकर रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.