Rajasthan Police Caught Husband Wife For 4 Fake Marriages; खोटी लग्नं करणाऱ्या दोघांना अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर: पैसे लुटून फरार होणाऱ्या नवऱ्या मुलींचे किस्से तुम्ही ऐकले असतील. लग्न करायचं, काही दिवस सासरी राहायचं, त्यानंतर व्यवस्थित रेकी करुन घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून जायचं, अशी त्यांची कार्यपद्धती असते. मात्र राजस्थान पोलिसांनी एक वेगळंच प्रकरण उघडकीस आणलं आहे. एका महिलेचा पतीच पैशांच्या हव्यासापोटी तिची लग्नं लावून द्यायचा.

पतीनं त्याच्या पत्नीचा विवाह एक, दोन नव्हे, चार जणांशी लावून दिला. लग्नानंतर नवरी तिच्या खऱ्या पतीला स्वत:चं लोकेशन पाठवायची. त्यानंतर त्याच्यासोबत पैसे आणि दागिने घेऊन फरार व्हायची. अतिशय चलाखीनं चोरी करुन फरार होणाऱ्या या जोडप्याला पोलिसांनी अटक केली. राजस्थानच्या अलवरमधील बानसूरमध्ये हा प्रकार घडला.
मृत्यूला बायको जबाबदार; जीन्समधले पैसे अंत्यविधीला वापरा! चिठ्ठी लिहून तरुणानं आयुष्य संपवलं
आसाममध्ये राहणारा एक जण त्याच्या पत्नीची ओळख अविवाहित म्हणून करुन द्यायचा. त्यानंतर तो तिचं लग्न लावून द्यायचा. संधी मिळाल्यानंतर १५ दिवसांत आरोपी तिला घेऊन फरार व्हायचा. त्यानंतर दोघे नवं सावज शोध लागायचे. त्या दोघांनी ३ जणांची फसवणूक केली. मात्र चौथ्याला चुना लावताना ते पकडले गेले.

अलवरच्या बानसूरमध्ये राहणाऱ्या ३६ वर्षांच्या हरिमोहन मीणाचा विवाह ३ जूनला आसामच्या माधुनीमध्ये राहणाऱ्या दीप्ती नाथसोबत झाला. हरिमोहनच्या कुटुंबियांनी सांगितलेले सर्व विधी दीप्तीनं लग्नात केले. लग्नासाठी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यातील चार लाख आसामचा रहिवासी असलेल्या लोयकालिताला (दीप्तीचा खरा पती) देण्यात आले.
मधल्या सुट्टीत धाप लागली, जिन्यांवर अचानक कोसळली; १७ वर्षांच्या तनिषासोबत काय घडलं?
दीप्ती लग्नानंतर १५ दिवसांनी पळण्याच्या प्रयत्नात होती. त्यामुळे तिच्यावर सासरच्यांना संशय आला. २१ जूनला दुपारी एक कार हरिमोहनच्या घराच्या बाहेर येऊन उभी राहिली. त्यानंतर चालकानं हॉर्न देण्यास सुरुवात केली. इशारा मिळताच दीप्ती घरातून पळाली आणि कारमध्ये बसली. तितक्यात हरिमोहनचा मोठा भाऊ हेमराज घराबाहेर आला. दीप्ती पळत असल्याचा अंदाज त्यानं बांधला आणि कुटुंबियांना आवाज दिला. यानंतर संपूर्ण कुटुंब घराबाहेर आलं. सगळे कारच्या समोर उभे राहिले आणि दीप्ती, लोयकालिताला पकडलं.

हरिमोहनच्या कुटुंबियांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांनी दीप्तीची चौकशी केली. आपण आधीपासूनच विवाहित असून लोयकालिता आपली पती आहे. त्याच्यापासून दोन मुलं आहेत, अशी माहिती तिनं पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. यामागे एखादी टोळी असावी असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस तपास करत आहेत.

[ad_2]

Related posts