Vaginal Wash Dont accidentally use these things to keep your vagina clean

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Intimate Wash for Women : आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये काही नाजूक अवयांवाचाही समावेश असतो. महिलांच्या शरीरातील योनीमार्ग ( Vagina ) हा देखील फार महत्त्वाचा आणि नाजूक अवयव मानला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, महिलांनी हा अवयव नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. अशातच आता प्रश्न असतो तो म्हणजे, योनी मार्ग म्हणजेच वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) कशी ठेवावी?

वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) ठेवताना योग्य आणि चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे वजायना साफ करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, याकडे महिलांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. कारण महिलांच्या शरीरातील हा भाग फार सेंसेटिव्ह असतो. 

योनीमार्ग ( Vagina ) कसा साफ करावा?

बाजारात वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) करण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया वजायना साफ करण्यासाठी कोणत्या गोष्टी निवडू नयेत. 

साबणाचा वापर करणं टाळा

बाजारात उपलब्ध असणारे साबण त्वचेसाठी खूप हानिकारक असतात. आपण वापर असलेल्या साबणामध्ये केमिकल्स असतात. ज्यामुळे त्वचेला नुकसान होतं. याशिवाय साबणारे योनीची पीएच पातळी खराब होऊ शकते. पीएच लेव्हल खराब होणं म्हणजे खाज सुटणं, पुरळ येणं आणि सूज येणं या समस्या दिसतात.

गरम पाणी

काही महिला वजायना स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात. जर तुम्ही योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करत असाल तर यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशावेळी तुम्ही गरम पाण्याव्यतिरीक्त कोमट किंवा थंड पाण्याने योनीमार्ग स्वच्छ करावा.

सेंटेड वॉश

योनीमार्गाला दुर्गंध येऊ नये यासाठी सेंटेड वॉश उपलब्ध असतात. ही उत्पादनं त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यांच्या वापरामुळे त्वचा तर काळी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सुगंधित वॉश, परफ्यूम आणि पावडर वापरू नका. 

योनीमार्ग साफ करण्याची योग्य पद्धत

वजायना स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही उत्पादनांचा वापर केला नाही तरीही उत्तम. योनीमार्ग साफ करण्यासाठी तुम्ही केवळ पाण्याचा वापर करू शकता. मात्र यावेळी पाणी योनीमार्गाच्या आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बोटांच्या सहाय्याने हळूवार पद्धतीने योनीमार्ग साफ करावा.

Related posts