Cigarette Pocket Lighters Ban Govt Prohibits Import Of Cigarette Lighter Under 20 Rs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: तुम्ही सिगारेट पित असाल आणि 20 रुपयाहून कमी किमतीचे पॉकेट लायटर (Cigarette Pocket Lighter Ban) वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सिगारेट लायटरच्या आयात धोरणात केंद्र सरकारने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 रुपयापेक्षा कमी किमतीच्या सर्व प्रकारच्या लायटर्सच्या आयातीवर बंदी आणण्याचा केंद्राने निर्णय घेतला आहे. या आधी या लायटर्सचा ड्यूटी फ्री वर्गात समावेश होता. आता त्यातून काढून प्रतिबंधित या वर्गामध्ये टाकण्यात आल्याने या लायटरची आयात करता येणार नाही. 

सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट व्यसनींना मोठा फटका बसणार आहे. देशात अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने 20 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सर्व प्रकारच्या लायटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. याबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. मात्र जर सीआयएफ म्हणजेच लायटरची किंमत, विमा आणि मालवाहतूक 20 रुपयांपेक्षा जास्त असेल तर हे लायटर आयात केले जाऊ शकतात.

या देशांतून लायटर आयात केले जातात

CIF चा वापर बाहेरील देशांमधून आयात केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ठरवण्यासाठी केला जातो. पॉकेट लायटर, गॅस लायटर, रिफिल किंवा रिफिल न करता येणाऱ्या लायटर्सवर बंदी घालण्यात आली आहे. पॉकेट, गॅस लाइटर, रिफिल किंवा रिफिल न करता येणाऱ्या लायटरची आयात गेल्या वर्ष 2022-23 मध्ये 6.6 दशलक्ष डॉलर्स होती. तर या वर्षी एप्रिलमध्ये त्याची किंमत 1.3 लाख डॉलर होती. हे चीन स्पेन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयात केले जातात.

गेल्या वर्षी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सरकारला पत्र लिहिले होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सिंगल यूज प्लॅस्टिक लाइटर्सवर बंदी घालण्यात यावी असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. दक्षिण भारतात, बहुतेक लोक काडेपेट्या बनवून आपला उदरनिर्वाह करतात. कमी किमतीच्या लायटरवर बंदी घातली तर दक्षिण भारतातील काडेपेटी बनवणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल असं ते म्हणाले होते. 

 

ही बातमी वाचा: 

 



[ad_2]

Related posts