Government Reduces GST Rate On Electronics Item Mobile Phone Tv Refrigerator And Many Home Applainces Check Full List Here

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Government Reduces GST Rate: अर्थ मंत्रालयानं (Ministry of Finance) सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. आता मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक गृहोपयोगी वस्तू (home applainces) स्वस्त होणार आहेत. अर्थ मंत्रालयानं अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी (GST) दरांत मोठी कपात केली आहे. अर्थ मंत्रालयानं अशा वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे, कुलर, गिझर इत्यादींवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

जीएसटीमध्ये मोठी कपात

मोबाईल फोन (Mobile), एलईडी बल्ब (LED Bulb), टीव्ही (TV), फ्रीजसह घरगुती उपकरणांवरील जीएसटी (GST Rate) मध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही, एलईडी बल्ब, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशिनवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयानं ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

अर्थमंत्रालयाकडून कोणत्या वस्तूंवरील जीएसटीत घट?

27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराचा टीव्ही स्वस्त 

जीएसटीच्या नव्या दरांनुसार, जर तुम्ही 27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराचा टीव्ही खरेदी केला, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे द्यावे लागतील. तसेच, बहुतेक कंपन्या किमान 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराचे टीव्ही तयार करतात. 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराच्या टीव्हीवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच त्यांच्यावर 31.3 टक्के जीएसटी लागू होईल.

मोबाईल फोनच्या किमतींतही घट

अर्थ मंत्रालयानं मोबाईलवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्येही घट केली आहे. यापूर्वी मोबाईलवर 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता, आता हा जीएसटी 12 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, आता तुम्ही नवा मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला मोबाईलच्या किमतीवर केवळ 12 टक्केच जीएसटी द्यावा लागणार आहे. अर्थ मंत्रालयानं जीएसटीवरील किमतींत घट केल्यामुळे मोबाईल उत्पादक कंपन्या मोबाईच्या किमती कमी करु शकतात. एकंदरीत येत्या सणासुदीच्या काळात मोबाईल फोन खरेदी केल्यास कमी पैसे मोजावे लागतील. 



[ad_2]

Related posts