Vinod Jaitmahal Social Media Post On Buldhana Samrudhi Highway Accident Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Buldhana Accident :  नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा शुक्रवारी मध्यरात्री समृद्धी महामर्गावर (Samrudhi Highway) भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. परंतु नेमका हा अपघात कसा झाला यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बस सर्वात आधी लोखंडी पोलला धडकली त्यानंतर काही अंतरावर जाऊन पलटी झाली आणि तिने अचानक पेट घेतला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

पण आता प्रश्न असा निर्माण होतो की या बसमधील इतर सुविधांचं काय? संकटकाळात ज्या खिडकी किंवा दरवाजाचा वापर केला जातो ती नेमकी कुठे होती? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. यासंदर्भात सोशल मिडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. परंतु या सगळ्यामध्ये विनोद जैतमहाल यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. 

नेमकी काय आहे ही पोस्ट ?

संकटकाळाची खिडकी कुठे आहे?

वर्ष होते 2012. मुंबईत गोरेगावमध्ये केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये आमच्या नाटकाची तालीम सुरू होती. शनिवारी तेथे मुक्काम करून मी रविवारी परत जालन्याकडे निघालो. एका खासगी ट्रॅव्हल बसचे तिकीट होते. बसमध्ये बसलो. बस उभीच होती. माझ्यासमोर मधल्या भागात एक माणूस वाकून सीटखाली सामान ठेवत होता. अचानक त्याच्या पाठीवर वरून ठिणग्या पडू लागल्या. त्याचा शर्ट पेटला. तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याच्या सोबत एक छोटी मुलगी होती. तिच्या तोंडावर काही ठिणग्या पडल्या. तीही किंचाळू लागली. बसच्या छताला मध्यभागी लावलेली एसीची जाळी पेटली होती. बसमध्ये धूर, किंकाळ्या आणि बाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू झाली. आधी महिला व मुलांना बाहेर जाण्यासाठी वाट करून देत सर्व जण दारातून बाहेर पडले.पण सर्वच बसमधले प्रवासी इतके नशीबवान नसतात. त्यांना हकनाक जीव गमवावा लागतो. प्रत्येक वाहनाचा अपघात होणार हे गृहीत धरून आपण काय पूर्वतयारी करतो? काहीच नाही. 

प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण प्रवाशांना खालील गोष्टी सांगतो का…

1. संकटकाळी उघडणारा दरवाजा कुठे आहे? तो नीट उघडतो का?

2. खिडकीच्या काचा कशाने व कशा फोडाव्यात?

3. आग विझवणारी यंत्रणा कुठे आहे? ती कशी वापरावी?

4. ज्या मार्गावरून जात आहोत तेथे कुठे रुग्णालये आहेत? कुठे पोलिस स्टेशन आहेत? त्यांचे नंबर तिकीटावर छापलेत का? बसमध्ये लिहिलेत का?

अपघात होऊ नये म्हणून…

1. चालकाच्या अवस्थेवर लक्ष ठेवणारा निरीक्षक नेमणे शक्य नाही का?

2. या निरीक्षकाशी कंट्रोल रूमवरून सतत संपर्क साधणे अशक्य आहे का?

3. डीझेलची टाकी फुटू नये म्हणून आपण आजवर काही संशोधन केले आहे का?

4. बसमध्ये आग लागल्यास स्वयंचलित आग विझवणारी यंत्रणा 21 व्या अत्याधुनिक शतकातही बनवणे अशक्य आहे का?

5. प्रत्येक बससोबत सुरक्षेची काळजी घेणारे प्रशिक्षित लोक पाठवणे अगदीच अशक्य आहे का?

मरण पावलेल्या प्रत्येकासाठी सरकार 5 ते 7 लाख रुपये देते. 25 लोक मरण पावले तर पावणे दोन कोटी रुपये होतात. यातले अर्धे पैसे जरी कडेकोट सुरक्षेवर खर्च केले तर अपघात कमी होतील. जीव वाचतील.कुठल्याही बसमध्ये मेंढरासारखे लोक भरून असेच मरायला कसे सोडून देतो आपण?

 

हे ही वाचा : 

[ad_2]

Related posts