बोकडाच्या डोळ्यामुळं तरुणावर ओढावला मृत्यू, नवस फेडायला बळी दिला नंतर घडलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Goat Eye Took  The Life Of Man: बोकडाच्या डोळ्यामुळं एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील सूरजपूर जिल्ह्यात घडली आहे. नवस फेडायला म्हणून एका व्यक्तीने बोकडाचा बळी दिला मात्र याच बोकडामुळं त्याच्यावर जीव गमावण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेची परिसरात जोरदार चर्चा आहे. (Goat Eye Takes Life)

बोकडाच्या डोळ्यामुळं ओढावला मृत्यू

सूरजपूर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. बोकडाच्या डोळ्यामुळं या व्यक्तीवर मृत्यू ओढावला आहे. बोकडाचा बळी दिल्यानंतर त्या व्यक्तीने त्याचा डोळा खाल्ला. मात्र हा डोळा त्याच्या घशात अडकला आणि त्याला श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

नवस फेडायला गेला पण परतलाच नाही

बागर साय असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  रविवारी तो त्याच्या काही नातेवाईंकासह प्रसिद्ध खोपा धाम इथे गेला होता. तिथे त्याने काही वर्षांपूर्वी एक नवस मागितला होता. नवस पूर्ण झाल्यास बोकडाचा बळी देईन, असं त्यानं देवीला सांगितलं होतं. त्याइच्छेनुसार तो खोपा धाम इथे गेला होता. 

श्वास घेण्यास त्रास होऊ लागला

खोपा धाम इथे पूजा केल्यानंतर त्याने बोकडाचा बळी दिला. पूजा झाल्यानंतर बोकडाचे मटण शिजवण्याचे ठरवण्यात आले. बोकड साफ करतेवेळी तिथे डोळा काढून ठेवण्यात आला. त्याचवेळी चेष्टा मस्करी करताना बागर साय याने मोठ्या आवडीने बोकडाचा डोळा खाल्ला. मात्र, तो डोळा त्याच्या घशात जाऊन अडकला. बोकडाचा डोळा घशात अडकल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. 

घशात डोळा अडकल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला पाणी देऊन डोळा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची तब्येत अधिक खालावली आणि तो जागेवरच बेशुद्ध झाला. तेव्हा त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, कच्च मांस खाणं नुकसानदायक असते. कच्च मांस असल्यामुळं डोळा त्याच्या घशात अडकला व मृत्यू झाला, असं समोर आलं आहे. 

तातडीने रुग्णालयात दाखल केले

बागरची अवस्था पाहून त्याला त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना बागरच्या मृत्यूची खबर मिळताच ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले. नवस फेडायला गेलेल्या बागरचा असा आकस्मात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या घरातील सदस रडून-रडून बेजार झाले आहेत. 

Related posts