Lok Sabha Election 2024 Survey If Elections Held Today Who Would Get How Many Seats

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 Survey: पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) हळूहळू जवळ येत आहेत. सर्व राजकीय पक्ष त्याच्या तयारीला लागले आहेत. या सगळ्यात 2024 मध्ये देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक सर्वेक्षण समोर आलं आहे. जर आता लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या, तर जनतेला कोणाचं सरकार हवं आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच, या सर्वेक्षणातून जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. 

टाईम्स नाऊ आणि ईटीजीनं हे सर्वेक्षण केलं आहे, ज्यामध्ये काही लोकांना आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता येतील? हा प्रश्न विचारण्यात आला. सर्वेक्षणातील निष्कर्षातून अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. जर सद्यस्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपच्या वाट्याला गेल्या लोकसभेपेक्षा कमी जागा येतील, पण केंद्रात मात्र भाजपलाच बहुमत मिळण्याची शक्यता आहे. 

सर्वेक्षणाच्या आकडेवारीत एनडीए आघाडीला 285-325 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी काँग्रेस आघाडीला 111-149 जागा मिळण्याची शक्यता आहे.

TMC, YSRCP आणि BJD ला किती जागा?

जर आपण इतर पक्षांबद्दल बोललो तर तृणमूल काँग्रेसला (TMC) 20-22 जागा मिळतील असा अंदाज आहे. बिहारमध्येही एनडीएला 22-24 जागा मिळतील, तर राष्ट्रीय जनता दल-जनता दल युनायटेड-काँग्रेस महाआघाडीला 16-18 जागा मिळतील.

या सर्वेक्षणात वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला (YSRCP) 24-25 जागा मिळू शकतात आणि नवीन पटनायक यांच्या बीजेडीला (BJD) ओडिशात 12-14 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोणाला किती जागा?

सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशात भाजप 22 ते 24 जागा जिंकू शकते. याशिवाय राजस्थानमध्ये 20 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर त्यांना केवळ 3 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊच्या मते, ईटीजीच्या या सर्वेक्षणात 1.35 लाख लोकांनी भाग घेतला. ज्यामध्ये 40 टक्के लोकांकडून घरोघरी जाऊन प्रतिक्रिया घेण्यात आल्या, तर 60 टक्के लोकांशी फोनवर बोलून त्यांचं मत जाणून घेण्यात आलं. 

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जिथे विरोधी पक्ष महाआघाडीसाठी प्रयत्नशील आहेत, याचसंदर्भात त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर आता पुढील बैठक बंगळुरूमध्ये होणार आहे. तसेच, सध्या सत्तेत असलेली भाजप सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्नात आहे.

[ad_2]

Related posts