[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
इमारतीमध्ये राहणारे लोक नेहमी काळ्या रंगाच्या होंडा सिटी कारमधून प्रवास करायचे. आसपास राहणाऱ्या कोणाशीच त्यांचा संबंध नव्हता. ते कोणाशीही बोलायचे नाहीत. त्यांचं घर कायम आतून बंद असायचं. खिडक्यांना पडदे लावलेले होते. रात्रीच्या वेळीही घरातील दिवे सुरू असायचे. ही मंडळी तिप्पट भाडं देत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना राहायला दिलं होतं.
आरोपींनी घरासाठी ४४ हजार रुपये भाडं दिलं होतं. दुसऱ्या मजल्यावर त्यांनी अमली पदार्थांचा कारखाना सुरू केला होता, अशी माहिती डीसीपी साद मिया खान यांनी दिली. इमारतीजवळून जात असताना नेहमी दुर्गंधी यायची, असं जवळच राहणाऱ्या गौतम यांनी सांगितलं. इमारतीमध्ये अमली पदार्थ तयार केले जातात याबद्दल कोणालाही शंका आली नाही.
पोलिसांनी छापा टाकत अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केला. तिथे काम करत असलेल्या आफ्रिकन नागरिकांना बेड्या ठोकल्या. एक कार आणि चार मोबाईलदेखील जप्त केले. घरात तीन डायरी सापडल्या. त्यात महत्त्वाची माहिती आहे. डायरीत २०० पेक्षा अधिक मोबाईल नंबर आहेत. यामुळे आरोपींचं पूर्ण नेटवर्क हाती लागेल, असा विश्वास पोलिसांना आहे.
[ad_2]