Narendra Modi Cabinet Devendra Fadnavis Praful Patel Name in Race; आता वेध केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे, फडणवीसांच्या प्रमोशनची चर्चा, पटेलांना लॉटरी?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाची पाच तास मॅरेथॉन बैठक मंगळवारी घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या बहुधा अखेरच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावित फेरबदलाची जोरदार चर्चा आहे. येत्या ९ ते १२ जुलै दरम्यान कधीही विस्तार होऊ शकतो आणि त्यात काही बड्या मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

ज्या राज्यांत निवडणुका असतात तेथील चेहऱ्यांना झुकते माप देण्याची परंपरा पंतप्रधान पाळणार अशी चिन्हे आहेत. तेलंगण, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील अनेक नवीन चेहरे ‘टीम मोदी’मध्ये दिसू शकतात. महाराष्ट्रातील काही राज्यमंत्र्यांना लागलेल्या मंत्रिपदाच्या लॉटरीची मुदत संपत आल्याचेही संकेत आहेत. सध्या मोदी सरकारमध्ये ७५ मंत्री आहेत. विस्तारानंतर मोदींसह एकूण ८१ मंत्री होऊ शकतात.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ७ जुलैपर्यंत दिल्लीत नसतील. पंतप्रधान मोदी ७ व ८ जुलैला दिल्लीबाहेर आहेत. यानंतर पंतप्रधान १३ जुलैला फ्रान्सला जाणार आहेत. तेथून ते परतल्यावर लगेचच संसद अधिवेशन सुरू होईल. म्हणजेच ९ ते १२ जुलै या तीन दिवसांतच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

उत्तर प्रदेशातील महेंद्रनाथ पांडे, अजय मिश्रा टेनी यांच्यासह चार मंत्र्यांची खुर्ची धोक्यात आली आहे. गुजरातचे पुरुषोत्तम रुपाला, दर्शना जरदोश, तेलंगणचे जी. किशन रेड्डी यांचे स्थान धोक्यात आहे. बिहारमधून लोकजनशक्ती पक्षाचे (आर) चिराग पासवान, पंजाबमधून अकाली दलाच्या माजी मंत्री हरसिम्रत कौर बादल यांना मंत्रिपद मिळू शकते.
मराठी माणूस निवडणार आता भारताचा संघ, अजित आगरकरची बीसीसीआयमध्ये झोकात एंट्री

फडणवीसांचा खुंटा तूर्त बळकटच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीला बदली होणार असल्याची कुजबुज पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान सन २०२४च्या निवडणुकीपूर्वी फडणवीस यांचा एकखांबी तंबू महाराष्ट्रातून काढून घेण्याची शक्यता अंधुक आहे.

महाराष्ट्रातून वर्णी
– शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव व भावना गवळी यांची नावे चर्चेत. गवळींचे पारडे जड

– राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांचेही नाव चर्चेत आहे.
NCP Crisis : लेकीसाठी शरद पवारांनी राष्ट्रवादी फोडली, भाजपच्या मंत्र्याची बोचरी टीका

यांची खुर्ची धोक्यात

– रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचीची तयारी करणारे भागवत कराड, कपिल पाटील आदींची खुर्ची धोक्यात असल्याचे समजते.
Monsoon 2023 : मुंबई ठाण्यासह राज्यात विविध जिल्ह्यात अतिमुसळधार, आयएमडीकडून अंदाज, पाहा कुठं पाऊस पडणार

[ad_2]

Related posts