Mahendra Singh Dhoni Birthday Know 10 Interesting Facts About Dhoni Here

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MS Dhoni Birthday: महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हे क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. केवळ भारतातील क्रिकेट चाहत्यांनीच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. प्रामुख्याने एमएस धोनी (MS Dhoni) या नावाने तो ओळखला जातो. महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील. करिअरच्या टॉपला पोहोचण्यापर्यंतचा धोनीचा प्रवास उल्लेखनीय आहे. धोनीच्या जीवनातील मनोरंजक गोष्टी आज जाणून घेऊया.

भारतातील एका छोट्या गावात लहानाचा मोठा झाल्यामुळे महेंद्र सिंह धोनीची राहणी साधी होती. मैदानावर आणि मैदानाबाहेरही धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो त्याच्या उत्कृष्ट नेतृत्व क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा जिंकल्या. आयसीसी विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप यांचा त्यात समावेश आहे. उत्तम नेतृत्व, उत्कृष्ट फलंदाजी आणि विकेटकीपिंग कौशल्यं त्याला सर्वोत्तम खेळाडू बनवतात. धोनीबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे या वयातही तो इतर तरुण खेळाडूंइतकाच फिट आहे.

1. सुरुवातीचे जीवन आणि करिअर

महेंद्रसिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झारखंडमधील रांची येथे झाला. धोनीचे वडील पंप ऑपरेटर म्हणून काम करायचे आणि त्याची आई गृहिणी होती. घराजवळील शाळेतच त्याने शिक्षण घेतलं आणि तिथेच क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनसह विविध खेळांचा सराव केला.

बिहारच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड होण्यापूर्वी रांचीतील स्थानिक क्रिकेट क्लबमधून धोनी खेळत होता. त्यानंतर तो पूर्व विभागीय अंडर-19 संघाकडून खेळला, 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 62 चेंडूत 68 नाबाद धावांची खेळी साकारत आणि सामन्यात यश मिळवलं.

धोनीने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून त्याने सातत्यपूर्ण उत्तम फलंदाज आणि एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून कामगिरी बजावली. 2007 मध्ये धोनीची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. एमएस धोनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2011 सह विविध महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकल्या.

2. कॅप्टनसी रेकॉर्ड

एमएस धोनी हा क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. 2007 मध्ये त्याला क्रिकेटच्या सर्व प्रकारातील टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि 2017 पर्यंत त्याने कर्णधारपदाची भूमिका बजावली.

भारताने धोनीच्या नेतृत्वात 2010 आणि 2016 आशिया चषक, ICC क्रिकेट विश्वचषक 2011 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 यासह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या.

धोनीचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, त्याने विविध स्पर्धांच्या 199 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. यापैकी 110 सामने भारताने जिंकले, 74 गमावले आणि 5 बरोबरीत राहिले. कसोटी क्रिकेटच्या 60 सामन्यांमध्ये धोनीने भारताचं नेतृत्व केलं, यातील 27 सामने त्यांने जिंकले, 18 गमावले आणि 15 अनिर्णित राहिले.

3. हेलिकॉप्टर शॉट

धोनी त्याच्या फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो आणि त्याचा एक सिग्नेचर शॉट म्हणजे ‘हेलिकॉप्टर शॉट’. लेग साइडच्या बाऊंड्रीवर चेंडू मारण्यासाठी तो त्याच्या मजबूत मनगटाचा वापर करतो, त्याचा हा शॉट क्रिकेटमधील सर्वात खास शॉट्सपैकी एक बनला आहे.

हेलिकॉप्टर शॉट हा एक शॉट आहे ज्यासाठी उच्च पातळीचे कौशल्य आणि तंत्र आवश्यक आहे आणि धोनीने ते पूर्ण केलं आहे. यामध्ये बॅटला जास्तीत जास्त शक्ती आणि वेग निर्माण करण्यासाठी  मनगटाचा वापर केला जातो, ज्यामुळे चेंडू जोरात आणि दूरवर आदळला जातो. हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी खूप सराव आणि शक्ती लागते. धोनीच्या या शॉटनंतर इतर क्रिकेटपटूंना नवीन शॉट्स आणि तंत्र विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

4. भारतीय सैन्याकडून सन्मान

एक उत्कृष्ट क्रिकेटर असण्यापलीकडे धोनीचे भारतीय लष्कराशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तो भारतीय सैन्य दलाला खूप मानतो.

धोनीला 2011 मध्ये प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद रँक देण्यात आली होती. तेव्हापासून त्याने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या युनिटला वेळ देण्यासाठी 2019 मध्ये धोनीने भारतीय क्रिकेट संघासोबतचा दौरा देखील वगळला.

धोनीने भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटसोबत दोन आठवड्यांचं प्रशिक्षणही घेतलं आहे. त्याचं देशसेवेचं समर्पण क्रिकेटच्या क्षेत्रापलीकडेही आहे. लष्करातील त्याच्या सहभागामुळे त्याला संपूर्ण भारतातील चाहत्यांकडून प्रेम आणि आदर मिळाला आहे.

5. सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटू

एमएस धोनी सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. क्रिकेट व्यतिरिक्त विविध ब्रँड्सचं प्रमोशन आणि व्यावसायातून त्याला पैसे मिळतात. धोनीची एकूण संपत्ती 2023 मध्ये 12 कोटी डॉलर पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, यामुळे धोनी भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक बनला आहे.

धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. चेन्नई सुपर किंग (CSK) IPL च्या सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एकाचा तो सह-मालक आहे. त्याने रिअल इस्टेट फर्म आणि फिटनेस ब्रँड यांसारख्या इतर व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली आहे.

धोनीची लोकप्रियता आणि मैदानावरील यशामुळे तो Viacom18 सारख्या विविध प्रसिद्ध ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला. तो Oreo, Unacademy, Star Sports 2022, Cars24 इत्यादी मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती करतो.

6. पुरस्कार आणि सन्मान

एमएस धोनीने आपल्या शानदार कारकीर्दीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. धोनीला त्याच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2009 मध्ये भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार – पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. धोनीला एक उत्तम कर्णधार आणि नेतृत्व कौशल्यासाठी 2007 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे धोनीला 2008 आणि 2009 मध्ये दोनदा ICC ODI ‘प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून घोषित करण्यात आलं. 2008, 2009 आणि 2013 मध्ये तीन वेळा त्याची ICC ‘कॅप्टन ऑफ द इयर’ म्हणून निवड करण्यात आली.

टाईम मॅगझिनने जगातील पहिल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची नोंद केली होती. तसेच, फोर्ब्स मासिकाने जगातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून त्याला यादीत स्थान दिलं.

7. कॅप्टन कूल

धोनीला सहसा कॅप्टन कूल म्हटलं जातं. मैदानात त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता संघ हाताळल्यामुळे त्याला “कॅप्टन कूल” हे टोपणनाव मिळालं.

धोनीच्या शांत आणि संयमी स्वभावाने भारतीय क्रिकेट संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. उच्च-दबावाच्या परिस्थितीतही तो शांत राहतो ज्यामुळे संघातील इतर सदस्यांनाही आत्मविश्वास मिळतो.

2007 टी-20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी हे धोनीच्या कूल स्वभावाचं सर्वात परिपूर्ण उदाहरण आहे. कॅप्टन कूलमुळे भारताने दबाव असतानाही या सर्व स्पर्धा जिंकल्या.

8. रेकॉर्ड ब्रेकर

धोनीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत.














Title Record Ranking
MOST DISMISSALS IN AN INNINGS (ODIS) 6 Dismissals 1st
MOST DISMISSALS IN AN INNINGS (T20I) 5 Dismissals 1st
MOST STUMPINGS IN CAREER (T20I) 34 Stumpings in 98 matches 1st
CAPTAINS WHO HAVE KEPT WICKET (ODIS) 200 Matches 1st
CAPTAINS WHO HAVE KEPT WICKET (Test) 60 Matches 1st
MOST RUNS IN AN INNINGS BY A WICKETKEEPER (ODIS) 183* Runs 1st
MOST STUMPINGS IN AN INNINGS (ODIS) 3 Stumpings 1st
MOST MATCHES AS CAPTAIN (Combined) 332 matches 1st
MOST STUMPINGS IN CAREER (Combined) 195 Stumpings in 538 1st
MOST STUMPINGS IN CAREER (Test) 38 Stumpings in 90 matches 3rd

9. धोनीचे कुटुंब

धोनीने 2010 मध्ये हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असलेल्या साक्षी सिंह रावतशी लग्न केलं, या जोडप्याला झिवा नावाची मुलगी आहे. तिचा जन्म 6 फेब्रुवारी 2015 मध्ये झाला. क्रिकेटपटू आणि संघाचा कर्णधार असतानाही धोनीने नेहमीच आपल्या कुटुंबासाठी वेळ काढला आहे, त्याच्या यशाचे श्रेय तो अनेकदा पत्नी आणि मुलीला देतो.

10. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

एमएस धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे दीड दशकांहून अधिक काळ पसरलेल्या चमकदार कारकिर्दीचा अंत झाला. धोनी भारताकडून शेवटचा 2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

धोनीने भारतासाठी 90 कसोटी, 350 एकदिवसीय सामने आणि 98 टी-20 सामने खेळले. क्रिकेटच्या कारकिर्दीत त्याने 17,000 हून अधिक धावा केल्या. एक महान खेळाडू आणि कर्णधार म्हणून तो कायम स्मरणात राहील.

हेही वाचा:

GK : ‘या’ देशात नाही एकही ट्राफिक सिग्नल! ना कधी उद्भवत वाहतूक कोंडीची समस्या; मग कशा चालतात गाड्या? पाहा…

[ad_2]

Related posts