Madras High Court Declares As Invalid 2019 Lok Sabha Election Of Expelled AIADMK Member O P Ravindhranath

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tamilnadu: अण्णाद्रमुक पक्षाचे माजी नेते ओ पी रवींद्रनाथ यांना मद्रास उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. एआयएडीएमके पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या नेत्याने 2019 मध्ये थेनी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. आता तब्बल चार वर्षांनंतर न्यायालयाने त्यांची ही निवडणूक रद्द केली आहे. न्यायमूर्ती एसएस सुंदर यांनी थेनी मतदारसंघाची जागा रिक्त असल्याचे घोषित केले आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमचे (AIADMK) माजी खासदार ओ पी रवींद्रनाथ यांची निवडणूक रद्द केली आहे. 2019 मध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता, त्यानंतर रवींद्रनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेच्या तपशीलासह विविध माहिती लपवल्याची याचिका त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत, म्हणजेच 2019 मध्ये तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांचा मुलगा ओ पी रवींद्रनाथ यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या (AIADMK) वतीने निवडणूक लढवली होती आणि विजयी झाले होते. रवींद्रनाथ यांनी काँग्रेसच्या ईवीकेएस एलंगोवन यांचा 76,319 मतांनी पराभव केला. यानंतर थेनी मतदारसंघाचे मतदार असलेल्या मिलानी यांनी मद्रास उच्च न्यायालयात निवडणूक खटला दाखल केला.

ओ पी रवींद्रनाथ यांनी त्यांच्या अर्जात मालमत्तेच्या तपशिलासह इतर माहिती लपवली असून त्यामुळे त्यांचा थेणी मतदारसंघातील विजय अवैध घोषित करण्यात यावा, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एसएस सुंदर यांच्यासमोर सुनावणीसाठी आलं तेव्हा खासदार रवींद्रनाथ यांनी प्रत्यक्ष हजर राहून साक्ष दिली, यावेळी ओ पी रवींद्रनाथ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.

खासदार रवींद्रनाथ यांनी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर राहून कागदपत्रंही सादर केली. खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकालाला स्थगिती दिल्यानंतर न्यायाधीशांनी पुन्हा काही खुलासे मागितले. या प्रकरणाची पुन्हा चौकशी केल्यानंतरच कागदपत्रं सादर केली जातील, असं रवींद्रनाथ यांच्या वतीने सांगण्यात आलं. त्यानुसार रवींद्रनाथ 28 जून रोजी प्रत्यक्ष हजर झाले आणि त्यांनी अतिरिक्त कागदपत्रं दाखल केली.

तथापि, AIADMK खासदार ओपी रवींद्रनाथ यांची थेनी मतदारसंघातील निवडणूक गुरुवारी मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केली. न्यायमूर्ती एसएस सुंदर यांनी थेनी मतदारसंघाची जागा रिक्त असल्याचे घोषित केले. या प्रकरणी, न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यालाही स्थगिती दिली आहे.पी मिलानी नावाच्या थेनी मतदारसंघातील मतदाराने दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला.

मिलानी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, कागदपत्रांनुसार आणि सर्व अभ्यास करुन न्यायाधीशांनी रवींद्रनाथ यांची निवडणूक अवैध घोषित केली.

हेही वाचा:

[ad_2]

Related posts