Haryana Manohar Lal Khattar Announces 2750 Monthly Pension For Unmarried Men Women Widower Men Age Group Of 45 To 60

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: लग्न न झालेल्यांसाठी हरयाणा सरकारने मोठी घोषणा केली आहे. 45 ते 60 वयोगटातील ज्या पुरुषांचे आणि महिलांचे लग्न झालेलं नाही त्यांना हरयाणा सरकारकडून 2,750 रुपयांची मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या अविवाहित पुरुष आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 1.80 लाखांच्या आत आहे त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे.  

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज ही घोषणा केली आहे. यासोबत ज्या विधुर पुरुषांचे वय 40 ते 60 आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांच्या आत आहे, त्यांनाही  2,750 रुपयांची मासिक पेन्शन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. 

 

 

Haryana Pension Benificiary : याचा लाभ कोणाला मिळणार?

हरयाणा राज्य सरकारने सांगितले आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच याचा लाभ मिळेल. ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील सुमारे 1.25 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी हरियाणामध्ये वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाते. राज्य सरकारने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 3000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

हरयाणामध्ये येत्या काळात निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर लोकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. 

जमीन नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये राज्यातील जमीन नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचा महत्तपूर्ण निर्णय झाल्याची त्यांनी माहिती दिली. यामुळे आता जनतेला विनाकारण सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत, त्यांना मनस्ताप होणार नाही असंही ते म्हणाले. 

 

ही बातमी वाचा: 

 

 



[ad_2]

Related posts