[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शिवराज सिंह चौहान यांनी यानंतर दशरथला टिळा लावला. हार घालून सन्मान देखील केला. गणेशाची मूर्ती देखील शिवराज सिंह यांनी भेट दिली. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी हस्तोंदलन देखील केलं. त्या घटनेचा व्हिडिओ पाहून वेदना झाल्या. मी तुमची माफी माफी मागतो. लोक माझ्यासाठी भगवान आहेत, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
परवेश शुक्ला याच्या वडिलांच्या घराचा काही भाग स्थानिक अधिकाऱ्यांनी बुधवारी पाडला. ‘त्याचे वडील रमाकांत शुक्ला यांचे घर परवानगीनुसार बांधण्यात आलेले नव्हते. म्हणूनच बेकायदा भाग पाडण्यात आला,’ असे जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले. लघुशंका केल्याच्या घटनेविरोधात दलित आणि आदिवासींनी इंदूरमध्ये आंदोलन केले. मध्य प्रदेशमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या समुदायावरील अत्याचार वाढत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. अखिल भारतीय बालाई महासंघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी परवेश शुक्ला याला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी भाजपने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे, असे राज्यातील पक्षाचे प्रमुख व्ही. डी. शर्मा यांनी सांगितले. जनजाती विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रामलाल रौतेल या समितीचे अध्यक्ष आहेत. तर आमदार शरद कोल आणि अमर सिंह, तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष कांतदेव सिंह पॅनेलचे सदस्य आहेत. एका आदिवासी तरुणावर लघुशंका करतानाचा व्हिडीओ मंगळवारी समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
परवेश शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि ५०४ आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
[ad_2]