Blind Murder Mystery Man Kill Wife Boyfriends Mother MP; महिलेची तिच्याच घरात हत्या, कुठलाही सुगावा नाही, एक टीप अन् थरारक गुन्ह्याची उकल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: तीन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात एका महिलेच्या हत्येची घटना घडली होता. या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. या महिलेची हत्या तिच्याच भाडेकरुने केल्याचं समोर आलं आहे. भाडेकरुच्या पत्नीचे मृत महिलेच्या मुलासोबत अनैतिक संबंध होते. आरोपीने पत्नी आणि प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. आरोपी भाडेकरु हा पत्नीच्या प्रियकराला मारायला गेला होता, पण त्याला तो घरी सापडला नाही. यादरम्यान त्याच्या आईशी भाडेकरुचं भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने थेट महिलेलाच गोळ्या झाडून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामकृष्ण लोधी, असं आरोपीचं नाव आहे.जबलपूरच्या गाडा पोलिस स्टेशन अंतर्गत पिली इमारतीजवळ १५ मे रोजी रात्री ही घटना घडली होती. यलो बिल्डिंगजवळ राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळी पोहोचल्यावर आजूबाजूच्या लोकांनी महिलेची ओळख सांगितली. सरस्वती चौबे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. सुरुवातीला पोलिसांना या हत्येसंबंधी कुठलाही सुगावा सापडला नाही. कोणी आणि का ही थरारक घटना घडवून आणली असेल हा प्रश्न पोलिसांपुढे होता.

वर्षभर थोडं-थोडं पेट्रोल जमा केलं, मग पुतण्या आणि त्याच्या पत्नीला जिवंत पेटवलं, कारण काय?
पोलिसांना तपासात आढळून आलं की, सुरक्षा रक्षक रामकृष्ण लोधी हा ६ महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्यानंतर पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो फरार असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पथकाने घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली.

लग्नाच्या तीन महिन्यानंतरही पतीचा मधुचंद्राला नकार, सासूने विचारताच जावयाचं हादरवणारं उत्तर
आरोपी रामकृष्णची पत्नी आणि मृत महिलेचा मुलगा अजय यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. याच कारणावरून त्याने ६ महिन्यांपूर्वी सरस्वती चौबे यांचे घर सोडले होते. मात्र, तरीही अजय वारंवार त्याच्या घरी जात असे. १३ मे रोजी रामकृष्णने पत्नी आणि अजयला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर त्याच्या डोक्यात राग गेला आणि १५ मे रोजी संध्याकाळी तो अजयच्या घरी त्याला मारायला पोहोचला, मात्र तो घरी सापडला नाही.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

त्यानंतर त्याने अजयची आई सरस्वती चौबे यांच्याकडे मुलाची तक्रार केली. आपल्या मुलाला माझ्या पत्नीपासून लांब ठेव अशी ताकिदही दिली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सरस्वती चौबे यांनी रामकृष्ण यांना थप्पड लगावला. यामुळे अपमानित झालेल्या रामकृष्णने बंदुक काढली आणि थेट सरस्वतीवर गोळी झाडली. मानेच्या खाली गोळी लागल्याने सरस्वतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रामकृष्णने बंदूक आपल्या घरात लपवली आणि पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी रामकृष्णला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

[ad_2]

Related posts