पती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Love Affair News: पती- पत्नीचे नाते हे विश्वासावर टिकून राहते. जर त्यांच्या नात्यात विश्वासच नसेल तर नातं तुटायला वेळ लागत नाही. विश्वास हा दोन्हीकडून दाखवावा लागतो. अलीकडेच एक प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा संशय पत्नीला आला. पती गेल्या काही दिवसांपासून दुरावा बाळगत असल्याचे निदर्शनास आल्यावर पत्नी चिंतेत पडली. मात्र पतीचे सत्य कळताच पत्नीला अश्रू अनावर झाले. तसंच, पतीवर संशय घेतल्याचा पश्चात्तापही होऊ लागला. इंग्लंडमध्ये हा प्रकार घडला आहे. 

Emma Ruscoe वय 55 वर्षीय ही तिच्या पती Simon Ruscoeसोबत इंग्लंड येथे राहतात. या जोडप्याला दोन मुलं आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून Emma यांचे पती कुटुंबापासून दुरावा राखत होते. मुलांच्या संभाषणातही सहभागी होण्याचे ते टाळत होते. कुटुंबासंबंधी काही गोष्टी असतील तेदेखील ते विसरत होते. आम्ही ठरवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी ते विसरायचे. त्यामुळं मला खूप राग यायचा. सलग तीन वर्ष आम्ही त्यांचे हे वागणं सहन केलं. 

Simon आमच्यापासून लांब जात होते. त्यांच्या या वागण्याने मी खुप दुःखी होते. मला सुरुवातीला वाटले की त्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत. एका दुसऱ्या महिलेसोबत त्याचे अफेअर आहे. ते मित्रांसोबतही बाहेर फिरायला जाणे टाळत असायचे. आम्ही 2018मध्ये मोठ्या सुट्टीवरुन घरी आल्यानंतर आमच्यात छोट्याछोट्या गोष्टींवरुन वाद व्हायला लागले आणि ते गोष्टी विसरायला लागले. 

Simon गोष्टी विसरायला लागल्यावर मला थोडी चिंता वाटू लागली. म्हणून 2020मध्ये मी त्यांना मेमरी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र तिथे डॉक्टरांनी सांगितलेले कारण ऐकून माझ्या पायाखालची जमिनच सरकली. Simon जाणूनबुजून गोष्टी विसरत नव्हते त्यांना एक गंभीर आजार झाला होता. 

 Simon हे dementia या आजाराने ग्रस्त होते. गेल्या तीन वर्षांपासून ते आजाराने पीडित होते. या आजारात स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळं व्यक्ती गोष्टी विसरायला सुरुवात होते.  Simon यांच्या या आजाराबाबत कळल्यानंतर Emma काळजीत पडल्या. तसंच, त्यांच्यावर संशय घेतल्याचाही त्यांना पश्चात्ताप होत होता. आपण त्यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या विचारांमुळं त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

एमाने म्हटलं आहे की, माझ्या पतीच्या आजाराबाबत कळल्यावर मी त्याची पूर्ण काळजी घेण्याचे ठरवले. तोपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळं काम करत असतानादेखील माझ्या पतीची काळजी घेणे मला शक्य झाले. 

Related posts