Mughal Treasure Found In India Uttar Pradesh Gold Rings Coins and Brick; भारतात मुघलकालीन अनमोल खजिना सापडला, सोन्याची नाणी आणि विटा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

औरैया: उत्तर प्रदेशातील औरैया येथील एका घरातून मुघल काळातील खजिना सापडला आहे. घरात सुरू असलेल्या खोदकामात मजुरांना हा खजिना सापडला आहे. या खजिन्यात सोन्याची नाणी आणि विटांचाही समावेश असल्याचं सांगितले जाते आहे. खजिना सापडताच मजुरांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आरडोओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, एक मजूर या खजिन्यातील सोन्याची वीट घेऊन पळून गेला. त्यानंतर घराच्या मालकाने हा सापडलेला खजिना पोलिस ठाण्यात जमा केला. ही घटना मोहल्ला गुमटी मोहालची असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुमटी मोहाल येथे राहणाऱ्या दीपक यांच्या घरी बांधकाम सुरू होतं. दीपक यांच्या घराची जुनी भिंत पाडण्याचे काम सुरू होतं. दरम्यान, येथे खोदकाम सुरु असताना मजुरांना मुघलकालीन खजिना सापडला. त्यात सोन्याच्या अंगठ्या आणि नाणी होते. तर यात एक वीट अष्टधातुची असल्याचीही माहिती आहे. सापडलेला खजिना हा तो अत्यंत अनमोल मानला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित विभागालाही माहिती देण्यात आली आहे. तर दीपकने हा खजिना पोलिसांना सुपुर्द केला आहे.

कोवळ्या वयातील प्रेम! ७ वीच्या विद्यार्थ्याचं ८ वीतील मुलीशी अफेअर, नको ते करुन बसले, रुग्णालयात जाताच धक्का
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी घराच्या मालकाने ७ मे रोजी खजिना सापडल्याची माहिती कोणालाही दिली नव्हती. मात्र, स्थानिक पातळीवर चर्चा झाल्यानंतर ही बाब पोलिस आणि प्रशासनाच्या निदर्शनास आली. यानंतर पोलिसांनी मालकाशी संपर्क साधला. नियम आणि अटी सांगितल्यानंतर मालकाने खजिना जमा करण्याचे मान्य केले. त्याचवेळी सीसीटीव्हीमध्ये एक मजूरही घटनास्थळावरून फरार होताना दिसून आली. त्यानंतर या खजिन्यात सोन्याची विट असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

स्थानिक पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या नेत्याची पुण्यात गोळ्या घालून हत्या

[ad_2]

Related posts