Uttar Pradesh Crime News Father Killed Daughter Then Use Dogs Blood To Trap Brother And His Wife; आधी मुलीचा गळा चिरून संपवलं मग घरात सांडवलं श्वानाचं रक्त; वडिलांनी पुढे जे केलं ते धक्कादायक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हरदोई : उत्तर प्रदेश पोलिसांनी हरदोई जिल्ह्यातील एका मुलीच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनीच मुलीची हत्या केली होती. त्याला भाऊ आणि वहिनीला फसवायचं होतं. त्यामुळे त्याने सगळा कट रचल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना तरुणाचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरून मुलीची हत्या करण्यात आली. यानंतर वडिलांनी गावातील ४ जणांवर खुनाचा आरोप केला होता.

अनंगपाल असं आरोपी वडिलांचं नाव आहे. गेल्या ५ दिवसांपासून पोलीस त्याची चौकशी करत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिसांची दिशाभूल करत राहिला, परंतु त्याची कडक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याच्या मुलीचं गावातल्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. ती अनेकदा त्याच्याशी फोनवर बोलायची. याबाबत त्यांनी आपल्या मुलीला अनेकदा मनाई केली. पण, ती काही ऐकायला तयार नव्हती.

Crime Diary: प्रेम अन् मैत्रीवर विश्वास ठेवला इथेच चुकलं, पुण्यातल्या दर्शना पवारची मन सुन्न करणारी कहाणी

आरोपीने पोलिसांना सांगितला धक्कादायक कट…

आरोपी अनंगपालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या भावाच्या पत्नीचंही गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही गोष्ट त्याने आपल्या भावाला सांगितली. मात्र, याउलट पती-पत्नी दोघांनीही त्याला मारहाण केली. याआधीही गेट बसवण्यावरून भावासोबत वाद झाला होता. त्यामुळेच त्याने भाऊ, वहिनी आणि मुलीच्या प्रियकराला अडकवण्याचा कट रचला.

मुलीला नातेवाईकाच्या घरी नेण्याच्या बहाण्याने गावाबाहेर नेलं आणि…

आरोपीने पोलिसांना सांगितलं की मुलीला नातेवाईकाच्या घरी नेण्याच्या बहाण्याने गावाबाहेर नेलं. त्यानंतर धारदार विळ्याने तिचा गळा चिरला. यानंतर श्वानाच्या पिल्लाला त्यानं पकडलं आणि त्यालाही जखमी केलं आणि घरी फरशीवर त्याचं रक्त सांडलं. त्यामुळे मुलीचा खून हा भाऊ आणि वहिणीनेच केल्याचं सगळ्यांना वाटेल.

पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी धूर्तपणे हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ज्या शस्त्राने ही घटना घडली तेही जप्त करण्यात आले आहे. तर १ जुलै रोजी मुलीचा मृतदेह पोलिसांना शेतात सापडला होता.

फेसबुक लाईव्हमध्येच सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेचा गळफास, शेवटच्या क्षणाला सांगितलं भयंकर सत्य

[ad_2]

Related posts