[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
BMC Covid Center Scam: कथित कोविड सेंटर घोटाळा (Covid Scam) प्रकरणात तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनायाच्या (ईडी) पथकाला तपासात काही नवीन बाबी आढळून आल्या आहेत. भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यासाठी दंड ठोठावण्यात आलेल्या कंत्राटदारालाच कोविड दरम्यान ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 300 कोटी रुपये देण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
बुधवारी (5 जुलै) ईडीने मुंबई, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संबंधित सुमारे 10 कंत्राटदारांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. ईडीने ज्या कंत्राटदारांवर छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील कंत्राटदार रोमीन छेडा यांचा समावेश आहे. छेडा यांना कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांनी मुंबई पालिकेकडून (BMC) मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे.
महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) बुधवारी छापेमारी करण्यात आलेल्या सरकारी कंत्राटदारांची नावं समोर आली आहेत. रोमीन छेडा, रोमेल ग्रुपचे बिल्डर ज्यूड रोमेल आणि डॉमनिक रोमेल अशी कंत्राटदारांची नावं आहेत. मनपाच्या कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून या कंत्राटदारांच्या घरावर आणि कार्यालयांवर ईडीकडून बुधवारी छापेमारी करण्यात आली होती, त्याचबरोबर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान अशा एकूण 10 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. छापे टाकण्यात आलेली ठिकाणं ही कोविडच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेला सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदारांशी संबंधित होती. छापेमारी दरम्यान आरोप असलेल्या कंत्राटदारांकडून कोट्यवधींची रोख रक्कम आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
ज्या कंत्राटदारांवर ईडीने छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील रोमीन छेडा या कंत्राटदाराचा समावेश आहे, ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्यांना मनपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे. छेडा याने यूपी-स्थित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत कंत्राटाचं काम करून घेतल्याचा संशय आहे आणि कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्यांना सुमारे 300 कोटी रुपये दिले गेले होते, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. निकृष्ट उपकरणं पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.या प्रकरणाचा तपास सुरू असताना कंत्राटदाराच्या फायलींवर मनपा अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आणि त्याला भरघोस मोबदला दिला गेला, असंही सूत्रांनी सांगितलं. रोमीन छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहे, जी कंपनी यूपीतील अलाहाबाद येथे आहे. कोविड घोटाळ्याआधी भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यात या संस्थेला दंड ठोठावण्यात आला होता.
हेही वाचा:
[ad_2]