[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
या घटनेतील पीडित व्यक्ती व मारहाण करणारी व्यक्ती ग्वाल्हेरच्या डाब्रा येथील रहिवासी आहेत. गाडीतील हा आरोपी पीडित व्यक्तीस वारंवार थोबाडीत मारताना तसेच, शिवीगाळ करताना दिसत आहे. मारहाण करणारी ही व्यक्ती पीडित व्यक्तीस ‘गोलू गुर्जर बाप है’ असे म्हणण्याचीही सक्ती करताना दिसते. यानंतर आरोपीने धमकावल्याने पीडित व्यक्ती आरोपीचे तळवे चाटतानाही या व्हिडीओत दिसते. या घटनेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात या पीडित व्यक्तीस चपलेने मारहाण होताना दिसते.
हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ‘याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे’, अशी माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित व्हिडीओ न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘माझ्यावर लघुशंका करणाऱ्यास मुक्त करा’
भोपाळ : माझ्यावर लघुशंका करणाऱ्यास चूक उमगल्याने त्याची सुटका करावी, अशी विनंती सिधी जिल्ह्यातील धर्मेश रावत या व्यक्तीने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली. रावत हे भटक्या समाजातील असून, त्यांच्या डोक्यावर प्रवेश शुक्ला या व्यक्तीने लघुशंका केली होती. मंगळवारी यासंबंधी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी शुक्ला यांना अटक केली. मात्र, जे घडले ते घडले, शुक्ला यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. पोलिसांनी त्यांची सुटका करावी, अशी विनंती रावत यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याप्रकरणी रावत यांना गुरुवारी आपल्या निवासस्थानी बोलावले व त्यांची क्षमा मागत त्यांचे पाय धुतले.
[ad_2]