Chhatisgarh 3 Children From A Family Fell Into The Well And Died In Raipur; एकाच कुटुंबातील तीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रायपूर: एकाच कुटुंबातील तीन मुलांची विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे प्रकरण छत्तीसगडच्या रायपूरमधील आहे. जिल्ह्यातील आरंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारोडा गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. येथे आठ वर्षांची केसर साहू, केसरचा लहान भाऊ उल्लास साहू आणि चुलत भाऊ पायस साहू अशी तीन मुले विहिरीत पडली. या घटनेत तिन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आईचा एक गुरुमंत्र अन् मुलगा क्षणात कोट्यधीश झाला, कहाणी वाचून थक्क व्हाल…
ही तीन मुलं घराजवळील झाडावरून पेरू तोडत होती. झाडाजवळ मोठी विहीर आहे. पेरू तोडताना त्यांचा तोल जाऊन ही मुलं विहिरीत पडली. उशिरापर्यंत मुलं घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. विहिरीची जाळी आणि झाडाच्या फांद्या तुटल्याचं मुलांच्या आजीने पाहिलं. तिने विहिरीत डोकावून पाहिलं तर मुलं पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरड करत कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली.

आजीची हाक ऐकून कुटुंबीय धावत त्या दिशेने गेले, त्यांनी तात्काळ मुलांना विहिरीतून बाहेर काढलं. पण, तोपर्यंत या तिघांचाही मृत्यू झालेला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

सुदैवाने जीव वाचला, नाहीतर आज माझी मुलगी दिसली नसती; पीडित तरुणीच्या आईने सांगितली हकिगत

पेरू तोडण्यासाठी ही मुले झाडावर चढून फांदी तुटल्याने ते विहिरीत पडले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेत तीन मुलांनी आुला जीव गमावला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

[ad_2]

Related posts