Samudrayaan Mission Sea Trials Early 2024 Revisited Submersible Specifications Says NIOT Director

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samudrayaan Mission: समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ ही मोहीम सुरू केली आहे. या समुद्रयान मोहिमेची पहिली सागरी चाचणी पुढील वर्षी म्हणजे 2024 ला  पार पडणर  येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन  टेक्नॉलॉजीचे (NIOT)  संचालक डॉ. जीए रामदास यांनी ही माहिती  दिली आहे. एबीपी लाईवहला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत आहे. पहिल्या चाचणीसठी तीन तज्ज्ञांच्या टीम समुद्रात 500 मीटर खोलीवर पाठवण्यात येणार आहे. 

डॉ. जीए रामदास पुढे म्हणाले, समुद्रयान मोहीम 2026 सालांपर्यंत सुरू होईल. 2024 साली आम्ही या मोहिमेच्या पहिल्या चाचणीला सुरुवात करणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला  फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यत चाचणीला सुरुवात होईल. सुरुवातीला आम्ही 500 मीटर खोल समुद्रात ही चाचणी करणर असून हळूहळू हे अंतर वाढवणयात येणार आहे. 2025 सालच्या अखेरपर्यंत 6000 मीटर खोल  समुद्रात  चाचणी सुरु होतील.  या मोहिमेसाठी  NIOT ने मत्स्य 6000’ ( MATSYA 6000 Deep Submergence Vehicle )ही समुद्रात खोलवर जाऊन खनिजांचा शोध घेणारी स्वदेशी पाणबुडी विकसीत केली आहे.  ही पाणबुडी मॅगनीज, कोबाल्ट आणि इतर दुर्मीळ घटकांचा खोल समुद्रातील खनिज संसाधनांचा शोध घेणार आहे. ही पाणबुडी तीन व्यक्तींनी  6,000 मीटर खोलीपर्यंत घेऊन जाऊ शकते.

समुद्रयान  हे मिशन भारताला खोल समुद्रात संशोधन करण्यासाठी मानवयुक्त वाहने विकसीत करणाऱ्या अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन सारख्या देशांच्या प्रतितयश राष्ट्रांच्या पंगतीत आणणार आहे. खोल समुद्रात संशोधन करण्यासााठी केंद्र सरकारने  पाच वर्षांसाठी 4077 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.  अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन सबमर्सिबल या पाणबुडीचा स्फोट होऊन त्यामधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर या पाणबुडीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. 

मूलभूत रचना, साहित्याची निवड आणि चाचणीमध्ये या सर्वांची आम्ही विशष काळजी घेतली आहे. त्यामुळ या  गोष्टी असतात तेव्हा कोणत्याही आपत्तीची शक्यता फारच कमी असते. परंतु, आमच्याकडे आहे. आमच्या वैशिष्ट्यांची पुनरावृत्ती केली आणि आमच्या गोष्टी सुरक्षित आहेत याची पुन्हा एकदा पडताळणी केली, यात काही शंका नाही,  एनआयओटी संचालक म्हणाले.

मत्स्य  6000 हे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह खनिजांचा शोध घेणारे मानवयुक्त पाणबुडी आहे. इस्रो, आयआयटी आणि डीआरडीओच्या मदतीने ही पाणबुडी बनवण्यात आले आहे. हे पूर्णपणे भारतात बनवण्यात आले आहे.  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने (NIOT) रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्स (ROV) आणि ऑटोनॉमस कोरिंग सिस्टम (ACS) सारखा विविधा उपकरणांचा वापर समुद्राखालील संशोधनासाठी केला आहे.

[ad_2]

Related posts