[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra Rain : सध्या राज्यातील काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं दडी मारली आहे. पावसानं ओढ दिल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुासर महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही गंभीर परिस्थिती असून, तिथं सरासरीच्या 38 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं राज्यात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.
कोणत्या विभागात आत्तापर्यंत किती पाऊस झाला?
मराठवाड्यात 10 जुलैपर्यंत सरासरी 188 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यावर्षी आतापर्यंत फक्त 116 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. म्हणजे सरासरीपेक्षा 38 टक्के पाऊस कमी झाला आहे. राज्यात सर्वात भीषण स्थिती ही हिंगोलीत आहे. हिंगोलीत सरासरीच्या 83 टक्के पावसाची तूट आहे. सरासरी 240 मिमी पाऊस होत असतो. मात्र, फक्त 41.06 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात कमी पावसाची नोंद
विदर्भात सोमवारी (10 जुलै) चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप सरासरी काढता आलेली नाही. 10 जुलैपर्यंत 266.09 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र फक्त 180 मिमी पावसाची नोंद विदर्भात झाली आहे. विदर्भातील अकोल्यात सरासरीच्या 68 टक्के कमी पाऊस झाला आहे. 10 जुलैपर्यंत अकोल्यात 209.06 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र, आत्तापर्यंत अकोला जिल्ह्यात फक्त 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 29 टक्के कमी पाऊस
मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 29 टक्के पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात आत्तापर्यंत 162 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांगलीत सरासरीच्या 71 टक्के पावसाची तूट आहे. सांगलीत दरवर्षी आत्तापर्यंत 161 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र कालपर्यंत फक्त 47 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकणात चांगला पाऊस
राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात बरी परिस्थिती आहे. कोकणात सरासरीच्या एक टक्के पाऊस जास्त झाला आहे. 10 जुलैपर्यंत कोकणात सरासरी 1040 मिमी पाऊस होत असतो. मात्र आत्तापर्यंत कोणतात 1049 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे यावर्षी कोकणात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मात्र, असं असलं तरी मुंबई शहरात सरासरीच्या 39 टक्के तूट तर रत्नागिरीसारख्या अधिक पाऊस होणाऱ्या जिल्ह्यात 18 टक्के सरासरीच्या कमी पावसाची नोंद बघायला मिळत आहे.
अनेक भागात पावसाची दडी, पेरण्या खोळंबल्या
सध्या राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
[ad_2]