[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Red Honey: अनेकजण वापरत असलेल्या साध्या मधाबद्दल (Honey) तर सर्वांनाच माहिती असेल. मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मधाचं सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. पण तुम्ही कधी लाल मधाबद्दल ऐकलं आहे का? असं म्हणतात की या मधामुळे दारुपेक्षाही जास्त नशा होते. जगातील सर्वात मोठ्या मधमाश्या (Honeybees) हे मध जमा करतात, ज्यांचं नाव आहे ‘हिमालयन क्लिफ बी’. तर त्यांनी बनवलेल्या लाल मधाची खास वैशिष्ट्यं जाणून घेऊया.
विषारी फळांपासून गोळा केला जातो रस
लाल मध तयार करण्यासाठी हिमालयातील मधमाश्या (Himalayan Honeybees) विषारी फळांपासून रस गोळा करतात. हा मध अतिशय मादक आहे, यासोबतच यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. यामुळेच लाल मधाला जगभरात मोठी मागणी आहे. हे लाल मध मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाबासाठी (Blood Pressure) फायदेशीर आहे. मात्र, याचे सेवन केल्याने होणाऱ्या नशेमुळे लाल मधाला जास्त मागणी आहे.
लाल मध कुठे मिळतं?
हे लाल मध नेपाळच्या (Nepal) दूरवरच्या भागात आढळते. या मधाची एक खास गोष्ट म्हणजे ते काढणं हे अत्यंत धोक्याचं काम आहे. सामान्य मध काढण्यापेक्षाही जिकीरीचं काम म्हणजे हे लाल मध काढणं. मोठ्या आकाराच्या मधमाश्यांमुळे ते जास्तच धोक्याचं बनतं. गुरुंग जमातीचे लोक मोठ्या कष्टाने ते काढतात. लाल मध (Red Honey) काढण्यासाठी आधी दोरीच्या साहाय्याने कित्येक फूट उंचावर ते चढतात, त्यानंतर मधमाश्यांना धुराच्या सहाय्याने पळवले जाते. एवढंच नाही तर संतप्त मधमाशांचा डंक देखील मधमाश्यांचं पोळं काढणाऱ्यांना सहन करावा लागतो.
या लाल मधाची नशा अॅबसिंथेसारखी
लाल मधाची नशा ही अॅबसिंथे (Absinthe) नावाच्या मादक पेयाप्रमाणे आहे. अॅबसिंथे हे असं मादक पेय (Alcoholic Drink) आहे ज्यावर अनेक देशांमध्ये बंदी (Banned) आहे. या अल्कोहोलिक पेयामुळे खूप नशा चढते, त्यामुळे अनेक देशात त्यावर बंदी आहे. तर, अशाच प्रकारची नशा चढवणारं हे लाल मध आहे. पण या लाल मधाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका संभवू शकतो हेही तितकंच खरं आहे.
हेही वाचा:
Tobacco: तंबाखूचं सेवन करत होती आई, जन्मानंतर नवजात बाळामध्ये मिळाले निकोटिनचे अंश; डॉक्टरही चक्रावले
[ad_2]