Chandrayaan 3 All Set For Countdown To Begin For India’s Third Moon Mission

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrayaan 3: भारताची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ही आहे, जी 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल. ही मोहीम 2019 चांद्रयान-2 मोहिमेचा एक भाग आहे. 2019 मध्ये, लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट-लँड करू शकले नाहीत, ज्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती.

सुमारे 3.84 लाख किमी प्रवास केल्यानंतर, चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.

चांद्रयान-3 अंतराळ यानामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल (वजन 2,148 किलो), लँडर (1,723.89 किलो) आणि रोव्हर (26 किलो) यांचा समावेश आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) म्हटलं आहे.

चांद्रयान-3 चा मुख्य उद्देश लँडरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवणं हा आहे. त्यानंतर ते रोव्हर प्रयोग करण्यासाठी बाहेर पडेल. लँडरच्या इजेक्शननंतर प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे वाहून नेलेल्या पेलोडचे आयुष्य तीन ते सहा महिन्यांच्या दरम्यान असते. दुसरीकडे, लँडर आणि रोव्हरचं मिशन लाइफ 1 चंद्र दिवस किंवा 14 पृथ्वी दिवस आहे, असं इस्रोने म्हटलं आहे.

पहिल्यांदाच चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार

चांद्रयान ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान 3 इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान आहे. याआधीच्या चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान 3 चंद्रावरून उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करेल.

सतीश धवन स्पेस सेंटरमधून होणार प्रक्षेपण

चांद्रयान-3 LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून चांद्रयान 3 लाँच व्हेइकलसोबत म्हणजेच LVM3 रॉकेटसोबत जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरु आहे. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान 3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा महत्त्वाचा भाग चांद्रयान-3 हा चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 चा पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही.  चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून चांद्रयान 3 साठी मदत घेण्यात येणार आहे. चांद्रयान 3 यूएन राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान 3 च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणं पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे.

हेही वाचा:

Red Honey: दारुपेक्षा जास्त नशा ‘या’ लाल मधात! जगभरातून मोठी मागणी; कुठे मिळतं हे मध?

[ad_2]

Related posts