[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी कौन्सिलनं कॅसिनो, अश्वशर्यती आणि ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर आकारण्याची घोषणा केली आहे. जीएसटी कौन्सिलच्या नवी दिल्लीत झालेल्या ५०व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे जीएसटी कौन्सिलनं सिनेमागृहांमधल्या खाद्यपदार्थांवरचा जीएसटीही कमी करण्याची घोषणा केली आहे. सिनेमागृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर आजवर १८ टक्के जीएसटी आकारला जात होता. पण आता तो कमी करून पाच टक्के करण्याच्या निर्णयाला जीएसटी कौन्सिलमध्ये मंजुरी देण्यात आली. कर्करोग आणि इतर काही दुर्मिळ आजारांवरच्या उपचारांसाठी आयात करण्यात जाणार्‍या औषधांवरच्या जीएसटीत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.</p>
<p> </p>
[ad_2]