Heavy Rain Update Heavy Rainfall Alert In 18 States Flood Like Delhi Up Himachal Uttarakhand Death

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Heavy Rain Alert : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस (rain) सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठं नुकसान झालं आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पाऊस आणि पुराच्या तडाखा बसला आहे. यामध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर 497 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे 8644 गुरेही दगावली आहेत. 8815 घरांचे नुकसान झाले आहे, तर 47,225 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये जनजीवन विस्कळीत, 95 जणांचा मृत्यू 

हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. पर्वतीय राज्यातील 12 जिल्हे पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले आहेत. हिमाचल प्रदेशात पावसामुळे आतापर्यंत एकूण 95 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 लोक बेपत्ता आहेत, तर 99 जण जखमी आहेत. 76 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर 319 घरांचे काही अंशी नुकसान झाले आहे. तर 471 जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

पंजाब-हरियाणामध्ये 15  जणांचा मृत्यू

पंजाब आणि हरियाणातील अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पावसाशी संबंधित घटनांमुळे मंगळवारी आणखी सहा मृत्यूंची नोंद झाली असून, गेल्या तीन दिवसांतील एकूण मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. पंजाबमध्ये आठ, तर हरियाणामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. दोन्ही राज्यांमध्ये बचावकार्य सुरू आहे.

दिल्लीत यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली आहे

दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता जुन्या रेल्वे पुलावर नदीच्या पाण्याची पातळी 207.25 मीटर नोंदवण्यात आली. यमुनेची सर्वोच्च पूर पातळी 207.49 मीटरच्या जवळ आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक भागात घरांमध्ये पाणी तुंबले असून, त्यामुळे लोकांनी घरे खाली करून इतर ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

पावसाचा इशारा

ऑरेंज अलर्ट

उत्तराखंड
उत्तर प्रदेश
पूर्व भारतातील एक राज्य
पश्चिम मध्य प्रदेश
आसाम
मेघालय
अरुणाचल प्रदेश
उत्तर बंगाल, सिक्कीम

यलो अलर्ट 

पूर्व राजस्थान
पूर्व खासदार
छत्तीसगड
झारखंड
ओडिशा
महाराष्ट्र
गोवा
तेलंगणा
आंध्र प्रदेश
केरळा
तामिळनाडू
किनारी कर्नाटक

महत्त्वाच्या बातम्या:

Rain Update : पावसामुळं उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत, हिमाचलमध्ये 4000 कोटींचं नुकसान; आजही पावसाचा अंदाज  

[ad_2]

Related posts