Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 20th May 2023 Saturday Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.. 

उन्हाची झळ बसणार! पुढील तीन दिवस तापमान वाढणार

महाराष्ट्रासह देशात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. यात आणखी भर पडल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांमध्येही 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. वाचा सविस्तर

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा आज शपथविधी, उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार घेणार शपथ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरमय्या आणि शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्‍या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. वाचा सविस्तर

2000 रुपयांच्या नोटा कायमस्वरुपी बंद की तात्पुरता निर्णय? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात येणार असल्याची धक्कादायक घोषणा केली. याबरोबरच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जाऊ शकतात. 23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 2000 रुपयांच्या नोटांसंबंधी सर्व माहिती जाणून घ्या. वाचा सविस्तर

news reels Reels

आधीप्रमाणे हा देखील बालिश निर्णय, दोन हजारांच्या नोटा मागे घेण्याच्या निर्णयावर मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला असून, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. तर यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या निर्णयावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाचा सविस्तर

वास्को द गामाचा भारतात प्रवेश, कोलबंसचे निधन, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म; आज इतिहासात

आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी समुद्री मार्गाने युरोपला भारताच्याजवळ आणणारा खलाशी वास्को द गामा याने कालिकत बंदरात प्रवेश केला. त्याशिवाय, इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचं निधनही आजच्या दिवशी झाले. लेखक, पत्रकार ‘केसरी’चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. वाचा सविस्तर

आज ‘या’ राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा आहे आजचा शनिवार? राशीभविष्य जाणून घ्या

आज शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना सुख आणि समृद्धी मिळेल. या दिवशी कोणत्या राशीचं भाग्य उजळेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

केजरीवालांना झटका… केंद्राने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगसाठी आणला अध्यादेश

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला असून दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार स्वतःकडे ठेवण्यासाठी अध्यादेश काढला आहे. केंद्र सरकारने हा अध्यादेश दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार यांना दिला असून हा केजरीवाल सरकारसाठी मोठी धक्का असल्याचं सांगितलं जातंय. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी निकाल देताना दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार हे दिल्ली सरकारला असल्याचा निर्णय दिला होता. वाचा सविस्तर

राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिची अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. वाचा सविस्तर

[ad_2]

Related posts