Chandrayaan-3 Update: तुम्हाला माहिती आहे का? या क्षणाला चांद्रयान-३ कुठे आहे; ISROने दिली आणखी एक गुड न्यूज – isro again gives good news chandrayaan-3 update do you know where it is now

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी दुपारी चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण केले. एमव्हीएम-३ एम ४ या बाहुबली रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान-३ अवकाशात पोहोचले आणि या माहिमेतील पहिल्या टेस्टमध्ये इस्रो पास झाले. उड्डाणानंतरच्या २४ तासानंतर आता इस्रोने आणखी एक गुड न्यूज दिली आहे.

चांद्रयान-३ने पहिले ऑर्बिट मॅन्यूवरिंग यशस्वीपणे पार केले. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर चांद्रयान-३ची कक्षा यशस्वीपणे बदलली गेली आहे. आता त्याचे अंतर वाढवण्यात आले असून ते ४२ हजार किलो मीटर अंतरावर आहे. ही मोहिम ठरलेल्या नियोजनानुसार चालली असल्याचे इस्रोने सांगितले.

भारतासाठी अभिमानाचा क्षण, चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण; पाहा प्रक्षेपणाचा LIVE व्हिडिओ
कक्षेत बदल झाल्यानंतर चांद्रयान-३ हे आता ४२ हजार किमीच्या ऑर्बिटवर पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. चांद्रयान-३ला एमव्हीएम-३ एम ४ या रॉकेटच्या मदतीने पृथ्वीच्या अंडाकृती कक्षेत सोडम्यात आले होते. त्याचे पृथ्वीपासूनचे कमीत कमी अंतर १७९ किलो मीटर तर जास्ती जास्त अंतर ३६ हजार ५०० किमी असेल. हे अंतर ४२ हजार किमी पर्यंत वाढवले जाईल.

इस्रोने शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून आपल्या तिसऱ्या चांद्र मोहिमेला सुरुवात केली होती. या मोहिमेच्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या भूमीवर यशस्वीपणे उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. या मोहिमेत जर यश आले तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरेल.

Chandrayaan 3: उड्डाणानंतरचा सर्वात भावनिक क्षणाचा Video; आनंदआश्रू, प्रोजेक्ट डायरेक्टरना शब्द सुचेनात, चेअरमन खुर्चीवरून…
चांद्रयान-३चे सॉफ्ट लँडिंग २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी करण्याची इस्रोची योजना आहे. गेल्या १५ वर्षातील इस्रोची तिसरी चंद्र मोहिम आहे.

या मोहिमेची उद्दिष्टे

चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. तसेच चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणे आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणे ही यामागची उद्दिष्ट्ये आहेत. याआधी चांद्रयान-२ मोहिमेत भारताने लँडर चंद्राच्या भूमीवर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा अपयश आले होते.

भारतासाठी ऐतिहासिक दिवस; चांद्रयान ३ कडे जगाचं लक्ष, इस्रोच्या अथक मेहनतीने इतिहास रचणार

[ad_2]

Related posts