India Weather News Flood Conditions In Northern States Imd Rain 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Weather Alert : सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह (Himachal pradesh) अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. रस्ते बंद झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुरामुळं मोठं नुकसान झालं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवस म्हणजे रविवार (16 जुलै), सोमवार (17 जुलै) आणि मंगळवार (18 जुलै) मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशात 17 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आज मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

या 12 राज्यांमध्ये पुरामुळं गंभीर स्थिती

यमुनेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं दिल्ली भीषण पुराच्या तडाख्यात आहे.  देशातील 12 राज्यात पुरामुळ गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, बिहार या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि बिहार या तीन राज्यांमध्येच पूर पूर्व चेतावणी प्रणाली उपलब्ध आहे. अन्य राज्यांमध्ये धोक्याची कल्पना देणारी प्रणाली उपलब्ध नसल्यानं नागरिकांना धोक्याचा सामना करावा लागत आहे. 

पंजाब आणि हरियाणामध्येही जनजीवन विस्कळीत 

पंजाब आणि हरियाणामध्ये देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक लोकांना घरे सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील जवळपास 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठं नुकसान झालं आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत साडे पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळं अनेक भागात भूस्खलन झालं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Rain Update : उत्तर भारताला पुराचा मोठा फटका, आज पावसाचा ऑरेंज अलर्ट; हिमाचल प्रदेशला 180 कोटी रुपयांची मदत जाहीर 

 

[ad_2]

Related posts