Chandrapur Rain News Heavy Rains In Five Talukas Of Chandrapur District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrapur Rain : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे.  या पावसामुळं जिकडे तिकडे पाणीचं पाणी झालं आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान, चिमूर तालुक्यातल्या पांजरेपार गावातील नाल्याला पूर आला आहे. या पुराचं पाणी गावात शिरलं  आहे. 

नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ 

चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सावली तालुक्यात 143 मिमी, नागभीड तालुक्यात 123 मिमी, ब्रम्हपुरी 85 मिमी, सिंदेवाही तालुक्यात 70 मिमी तर पोंभूरणा तालुक्यात 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शंकरपूर येथून जवळच असलेले पांजरेपार गावामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरेपार गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आला आहे. त्यामुळं आज पहाटे गावाला पुराचा वेढा पडला आहे. गावातील तीन ते चार घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. मात्र, पावसाचा जोर उतरल्यानं पुराचं पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी गावात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. 

चारगाव नदीलाही पूर 

सावली तालुक्यातील चारगाव नदीलाही पूर आला आहे. काल रात्री सावली तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने चारगाव येथील पुलावरुन पाणी वाहत आहे. नदीचं पाणी पुलावरुन जात असल्यानं सावली ते चारगाव, भारपायली, मानकापूर, मेटेगाव, पांढरसराड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

[ad_2]

Related posts