Karnataka Man Ties Leopard Cub To Bike With Rope; बिबट्याला बाईकला बांधून २ किमी प्रवास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरू: एक दुचाकीस्वार बिबट्याला बांधून नेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बिबट्याला बाईकवर मागे बांधून दुचाकीस्वार निघाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अतिशय घातक आणि आक्रमक प्राणी असलेल्या बिबट्याला चक्क बाईकवर बांधून नेणारा धाडसी माणूस आहे तरी कोण, नेमकं घडलं तरी काय, असे प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडले आहेत.

व्हायरल झालेला व्हिडीओ कर्नाटकचा आहे. व्हिडीओमध्ये बिबट्याचा बछडा दिसत आहे. त्याचं वय केवळ ९ महिने आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव मुथू आहे. तो हसन जिल्ह्याच्या बागिवलु गावचा रहिवासी आहे. बछड्याला वन विभागाच्या ताब्यात दिल्याचं त्यानं सांगितलं. ‘शेतात जात असताना बिबट्यानं हल्ला केला. बिबट्या जखमी अवस्थेत होता. त्यामुळे त्याला दोरीनं दुचाकीला बांधलं आणि वन विभागाकडे सुपूर्द केलं,’असा घटनाक्रम मुथूनं कथन केला.

या प्रकरणात मुथूचा हेतू अजिबात वाईट नव्हता, असं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. ‘मुथूचा उद्देश चुकीचा नव्हता. मात्र त्यानं ज्याप्रकारे बछड्याला पकडलं, ती पद्धत योग्य नव्हती. जागरुकतेच्या अभावामुळे ते घडलं,’असं अधिकारी म्हणाले. बछडा अतिशय कमजोर आहे. तो केवळ ९ महिन्यांचा आहे. त्यापासून कोणताही धोका नाही. त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्याला निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बछड्याला पकडताना मुथूला इजा झाली. त्याच्या हातावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. वन विभागाकडून मुथूचं समुपदेशन करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास नेमकं काय करायचं, याची माहिती आणि मार्गदर्शन त्याला दिलं जात आहे. मुथूच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

[ad_2]

Related posts