हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; घरं अन् रस्तेही वाहिले, पुरामुळे तब्बल ८ हजार कोटींचे नुकसान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, शिमला: हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भूस्खलन; तसेच पूरस्थितीमुळे रस्त्यांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी शनिवारी दिली. राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सुक्खू यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दोन हजार कोटी रुपयांची अंतरिम मदत मागितली आहे.

‘राज्यभरातून सुमारे ७० हजार पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी एकूण १५ हजार वाहने रवाना करण्यात आली. मात्र, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही पर्यटकांनी स्वेच्छेने राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पर्यटकांची संख्या सुमारे ५०० आहे. कुल्लू जिल्ह्यातील कासोल, मणिकरण; तसेच लगतच्या भागांत अडकलेल्या पर्यटकांनी त्यांच्या वाहनांशिवाय राज्याबाहेर जाण्यास नकार दिला. कासोल-भुंटर मार्गावर दुंखराजवळ दरड कोसळल्याने वाहने हलवता आली नाहीत. परिणामी, पर्यटकांना पलीकडे जाण्यासाठी कसरत करावी लागली. मात्र, राज्य सरकार या पर्यटकांची काळजी घेत आहे,’ असे सुक्खू यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कपडे धुण्यासाठी गेलेली १४ वर्षाची मुलगी बेपत्ता, दोघींना वाचवण्यात यश

‘राज्यातील सुमारे ८० टक्के आपत्तीग्रस्त भागात वीज, पाणी आणि मोबाइल आदी सेवा तात्पुरत्या स्वरूपात पूर्ववत करण्यात आल्या आहेत. उर्वरित भागात अत्यावश्यक सेवा लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,’ असेही निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशात १८ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे; तसेच २१ जुलैपर्यंत जास्त पावसाचा अंदाज आहे.

ओडिशालाही तडाखा:

ओडिशाच्या अनेक भागांना, विशेषत: किनारपट्टीला शनिवारी मुसळधार पावसाने तडाखा दिला. यामुळे राजधानी भुवनेश्वर आणि लगतच्या कटक शहरात रस्ते जलमय झाले. गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. अनेक झोपडपट्ट्या आणि सखल भाग पाण्याखाली गेले. भारतीय हवामान खात्याने ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार-पाच दिवसांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे.

सात उपविभागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस:

उत्तर आणि वायव्य भारतामध्ये काही दिवस झालेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत हवामान विभागाच्या ३६पैकी सात उप‌विभागांत सरासरीपेक्षा ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र व कच्छ, पंजाब, हरियाना, पश्चिम राजस्थान, चंडीगड व दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या सात उपविभागांमध्ये प्रचंड पाऊस झाला. हिमाचल प्रदेशात १६८ टक्के पाऊस झाला. सौराष्ट्र व कच्छ या उपविभागात १५९ टक्के जास्त पाऊस झाला. पंजाबमध्ये १२४ टक्के, दिल्लीमध्ये ११० टक्के, राजस्थानमध्ये ३६ टक्के जास्त पाऊस झाला.

पर्यटकांची हुल्लडबाजी, काही जणांनी जीव गमावला आता प्रशासनाचं मोठं पाऊल, पावसाळी पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी इशारा

बिहारमध्ये वीज पडून १८ ठार:

गेल्या २४ तासांत बिहारच्या विविध भागांत वीज पडून १८ जण ठार झाले आहेत. रोहतास जिल्ह्यात सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून अरवलमध्ये चार, सारणमध्ये तीन तर औरंगाबाद आणि पूर्व चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी दोन नाग नागरिक ठार झाले आहेत. बांका आणि वैशाली जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

[ad_2]

Related posts