[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सागर: कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात रविवारी ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चनाटौरिया टोल प्लाझाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर कारचे गेट तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
जखमी अमरदीप हा दुबे ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक आणि काँग्रेस नेते अमित दुबे यांचा पुतण्या आहे. अमर दुबे हा त्याच्या ६ मित्रांसह शाहपूरला जात होता. त्यांची कार चनाटौरिया टोलनाक्याच्या पुढे येताच बाम्होरी डुंडरच्या पठारावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. या धडकेत कारचा चक्काचूर झाला, तर ट्रक रस्त्यावरून घसरून झाडावर आदळला.

अपघाताची माहिती मिळताच बहेरिया आणि सानौधा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गेट तोडून कारमध्ये अडकलेल्या जखमीला आणि मृतांना बाहेर काढण्यात आले. जखमीला मक्रोनिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या अमर दुबे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचे मित्र मुकेश रैकवार (२८), पंकज रैकवार (३५), गणेश रैकवार (४२), पवन रैकवार (३०), ब्रिजेश ठाकूर (३५) आणि अर्पित जैन (२८) यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सर्व मृतदेह बीएमसीमध्ये नेले जेथे त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोलिसांनी अपघातस्थळावरून ट्रक जप्त केला असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
[ad_2]