इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न बंधनात अडकण्यापूर्वी एका जोडप्यानं विष खाल्लं. कनाडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आर्य समाज मंदिरात ही घटना घडली. लग्न करण्यासाठी गेलेल्या जोडप्यानं मंदिरात विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी नवरदेवाला मृत घोषित केलं. तर त्याच्या प्रेयसीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.लग्नाच्या आधी नेमकं काय घडलं, ज्यामुळे जोडप्यानं विष खाण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरुणी तरुणाला एका गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत होती, असा आरोप त्याच्या कुटुंबानं केला आहे. ‘तरुणी काही दिवसांपू्र्वी आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली होती. तिथे पोलिसांनी दोघांची समजूत काढली. तेव्हापासून तरुण तणावाखाली होता. तो लग्नासाठी तयार झाला. मात्र लग्नाच्या काही वेळापूर्वी दोघांचा वाद झाला. त्यानंतर दोघांनी विषारी पदार्थ सेवन केलं,’ अशी माहिती तरुणाच्या नातेवाईकांनी दिली.
व्हॉट्स अॅप डीपी बदलला, पोलिसांनी बेड्या ठोकल्या; हुश्शार महिला तुरुंगात, प्रकरण काय?
ओला कंपनीत काम करणाऱ्या दीपक अहिरवारचा साखरपुडा सव्वा वर्षांपूर्वी निशा नावाच्या तरुणीशी झाला. दोघे सात वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. एका कंपनीत काम करताना दोघांची ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या.
निशा अनेकदा दीपककडे पैशांची मागणी करायची अशी माहिती समोर आली आहे. जोपर्यंत माझं करिअर रुळावर येत नाही, तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असं दीपकनं निशाला सांगितलं होतं. मात्र निशा सातत्यानं दीपकवर लग्नासाठी दबाव आणत होती. अखेर दीपक लग्नाला तयार झाला. कनाडिया रोडवर असलेल्या आर्य समाज मंदिरात दोघे लग्न करणार होते. मात्र लग्नापूर्वीच दोघांनी विष खाल्लं.
तूच किरण, तूच अंधार! मैत्रिणीला संपवून तरुणाचं टोकाचं पाऊल; लॅपटॉपमध्ये २३ मिनिटांचा VIDEO
विष खाल्ल्यानंतर दीपकचा मृत्यू झाला. यावरुन त्याच्या कुटुंबियांनी निशावर गंभीर आरोप केले आहेत. निशावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. आर्य समाज मंदिरात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात जोडप्यानं विष खाल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांचे जबाब नोंदवले.